एक मुठ अनाथांसाठी उपक्रम पहिल्याच दिवशी ५० पोती धान्य जमा ..
श्रीगोंदा,दिनांक २० मार्च:
अग्नीपंख फौंडेशनने अनाथ,अपंग,मतिमंद,वंचितांची भागविण्यासाठी एक मुठ धान्य, ६३ शाळा
विद्यालयात सुरू आहे.दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना
पहिल्या दिवशी सुमारे ५० पोती धान्य जमा. हा उपक्रम चार दिवस चालणार आहे.
घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात उद्योजक प्रकाश कुतवळ व मोहन आढाव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू ललीता संदीप भोसले (बाबर) यांनी एक पोत धान्य जमा केले.अनेक यात अनेकनागरिक धान्य जमा करणार आहेत.याप्रसंगी मोहन आढाव यांनी विद्यालयास २१ हजाराची मदत केली.
प्रकाश कुतवळ म्हणाले की,अग्नीपंख फौंडेशनने वंचित बालकांची भुक भागविण्यासाठी एक मुठ धान्याचा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे .आपणही या उपक्रमात सहभागी होणार आहोत असेही त्यानी नमूद केले आहे .
मोहन आढाव म्हणाले की,दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना,पालक सकारात्मक दृष्टिकोन मदत करीत आहेत.यावेळी मुख्याध्यापक सचीन लगड,रमजान हवालदार, केंद्रप्रमुख खामकर, किशोर थिटे उपस्थित होते.