मुंबई जामखेड बस मध्ये महिलेने दिला मुलीला जन्म ..

श्रीगोंदा दिनांक १८ मार्च:
मुबई सेंट्रल जामखेड(बस क्रमांक ९२४८) या गाडीने बाभूळगाव तालुका कर्जत याठिकाणी प्रवासासाठी निघालेल्या महिलेला दौंड जवळपास असलेल्या अतिथी या हॉटेल जवळ प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. यावेळी प्रसंगावधान साधत,नमूद गाडीचे वाहक लटपटे ए.पी. व चालक सातपुते यांनी गाडी बाजूला थांबवून महिला प्रवाश्यांच्या मदतीने,सौ.सीमा नितेश भोसले या महिलेची सुखरूप प्रसूती झाली असल्याचे सांगितले आहे.या महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे.
प्रसूती नंतर दौंडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात या महिलेला पुढील उपचारासाठी दाखल करण्यांत आले असल्याचेही यावेळी माध्यमांसी बोलताना वाहक लटपटे व चालक सातपुते यांनी सांगितले आहे.
अश्या प्रसंगी सरकारी कर्मचारी यांनी केलेली मदत आणि प्रवाश्यांनी दाखवलेली तत्परता समाजात मामुसकी टिकून असल्याचे उदाहरण स्पष्ट करते आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading