श्रीगोंदा दिनांक १६ मार्च :
दलित महासंघाची वार्षिक सर्व साधारण सभा प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ सुलाखे पाटील, यांच्या आदेशानुसार व मा.नामदेवराव चांदणे.(अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती) यांच्या अध्यक्षतेखाली, सोमवार ११ मार्च रोजी दादासाहेब रुपवते विद्यालया येथे संपन्न झाली.प्रथम बीड जिल्ह्यातील केज येथे मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार आरक्षण मिळावे,म्हणून जलसमाधी घेऊन आपले जीवाचे बलिदान दिलेले दिवंगत संजय ताकतोडे यांना दलित महासंघाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली . मा.काशिनाथ सुलाखे पाटील यांनी तरुण चेहऱ्यांना संघटनेत काम करण्याची संधी मिळावी तसेच निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्ताना प्रोत्साहान मिळावे व संघटनेच्या वाढीसाठी जिल्हाध्यक्ष पदी मा.संजय चांदणे यांची फेर निवड करण्यात आली.तसेच अनेक नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे. यावेळी,जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल असे सुलाखे पाटील यांनी नमूद केले.याप्रसंगी संघटनेच्या वाढ व विकासासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नूतन जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी निष्ठेने तसेच संघटनेच्या विकास व वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करू अशी यावेळी ग्वाही दिली.
(महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष)पदी ,सौ.अरुणाताई कांबळे,(जिल्हा संपर्क प्रमुख)मा.कडूबाबा लोंढे,(जिल्हा उपाध्यक्ष)किशोर वाघमारे,(उपसंपर्क प्रमुख)सलिम सय्यद,(जिल्हा संघटक)निलेश चांदणे,(उपसंघटक),शिवाजी बुलाखे,(नगर तालुकाध्यक्ष),रफिक शेख,(नगर तालुका महिला आघाडी अध्यक्ष)सौ.शोभाताई चांदणे,(श्रीगोंदा तालुकाध्यक्ष)चंद्रकांत सकट,(पारनेर तालुकाध्यक्ष)प्रविण औचिते,(नेवासा तालुकाध्यक्ष) किशोर ताकवणे,(पाटोदा तालुकाध्यक्ष),दत्ता वाघमारे,(कर्जत तालुकाध्यक्ष)नवनाथ उकिर्डे,( नगर शहर अध्यक्ष)विशाल भालेराव यांची निवड करण्यात आली. या बैठकीस दलित महासंघाचे अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.सभेत शेवटी कडूबाबा लोंढे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत आभार मानले.