सुफी संत शेख महमंद बाबा यांच्या समाधीला वारसांच्या हस्ते चंदन लेप लावून, मौलाना व उपस्थित सर्व धर्मियांच्या वतीने प्रार्थना कार्यक्रम संपन्न..

श्रीगोंदा दिनांक १६ मार्च :
सबंध देशवासियांना राष्ट्रीय ऐक्याची प्रेरणा देणारे व सर्व धर्मियांचे श्रद्धांस्थान तशेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचे गुरू म्हणजे श्रीगोंदा येथील शेख महंमद बाबा.समाजातील प्रत्येक स्थरातील व्यक्ती श्रीगोंदा सोडून कोठेही जगाच्या पाठीवर आपल्या कर्तव्यावर असुद्यात,शेख महंमद बाबांच्या उरूस,जत्रा,यात्रा,संदल मध्ये येणारच.स्थानिक महसूल सह पोलीस व इतर कोणत्याही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी असोत.तोही न चुकता याठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतोच.ही या आशास्थानाची खासीयत आहे.
दिनांक १७ मार्च रोजी महंमद बाबा यांचा ४०१ वा उरूस,संदल किंवा यात्रा उस्तव  आहे.यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात आलेले आहे. यामध्ये दिनांक १४ मार्च रोजी मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल कामिल चिस्ती यांचा कव्वालीचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात विवध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्याचबरोबर दिनांक १५ मार्च रोजी दुपारी जुम्माच्या नमाज नंतर, बाबांच्या दरबारात महिलांनी कुराण पठण केले.या कार्यक्रमानंतर रात्री बाबांच्या समाधीला त्यांच्या वारसांच्या हस्ते,चंदन लेप लावण्यात आला.मौलाना व उपस्थित सर्व धर्मियांच्या वतीने,याठिकाणी प्रार्थना होऊन चंदन लेपचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह सर्व समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान शहरातील ढोलताशा,बेंजो वादकांनी आपली कला सादर केली.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading