शांतता कमिटीच्या बैठकीत ठरलेल्या विषयांची पूर्तता न झाल्यास संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार..
श्रीगोंदा दिनांक १५ मार्च :
श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील सबंध समाजाचे आशास्थान असलेल्या शेख महंमद बाबा, यांचा यात्रा उस्तव दिनांक १७ मार्च रोजी होऊ घातला आहे.यानिमित्ताने स्थानिक प्रशासनाने दिनांक १२ मार्च रोजी शांतता कमिटीची बैठक बोलवून त्यात,शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थितांच्या चर्चेतून जनहिताचे काही प्रश्न समोर आले व सर्वानुमते त्या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
(त्यात यात्रेत उभारण्यात येणाऱ्या पाळण्यांचे दर ज्यामध्ये मोठा पाळणा(सर्वात मोठा आडवा व उभा)यांचे दर ३० रुपये व हे दोन पाळणे वगळता इतर सर्व छोटे पाळणे,त्यांचे दर २० ठरविण्यात आले आहे.)
(सर्व पाळणा चालकांनी या ठरलेल्या दरपत्रकानुसार पाळणा तिकीट घरांच्या समोर लावणे बंधनकारक असल्याचे यावेळी नमूद केले आहे.)
(यांविषयी कोणी सामन्यातुन जर तक्रार आली तर त्या पाळणा चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.)
(पार्किंगची सोय नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार असून,पार्किंग चे फलक व दिशादर्शक लावण्यात येणार आहेत.)
(यात्रेच्या ठिकाणी स्वइच्छे नुसार श्रीमंत महादजी शिंदे प्रतिष्ठान श्रीगोंदा,यांच्या वतीने सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.)
(प्रशासनामार्फत सर्व बारीक सारीक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारून संपर्कासाठी लागलीच मदत क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे.)
इत्यादी मुद्यांवर चर्चा झाली असून,यातील काही विषयांवर जर कोणाची हरकत असेल तर, लगेच कळवावे व मंजूर झालेल्या विषयांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.असे न झाल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करील,याविषयीची निवेदन संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा च्या वतीने तालुकाध्यक्ष अरविंद कापसे,शहराध्यक्ष सतिष बोरुडे, यांच्यासह गणेश अस्वर ,सुनील ढवळे,गणेश पारे, नाना शिंदे, इरफान शेख, प्रवीण काळे, राणा खेतमाळीस,यांनी दिले आहे.
प्रत्येक यात्रेच्या वेळी पाळणा चालक दलालांचा आधार घेत, पाळण्याच्या किमती भरमसाठ लावतात व त्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे.पाळण्यांच्या नावाखाली होणाऱ्या या लुटीला थांबविन्यासाठी सामान्य माणसांनी प्रशासनांकडे तक्रार करावी.असे,अवाहन करण्यात आले आहे.अश्या तक्रारी साठी श्रीगोंदा पोलीस ठाणे व श्रीगोंदा तहसील कार्यालयाशी संपर्क साधवा.