महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या वाहिनीचा मनोरा आदिवासींच्या शेतात.नुकसान भरपाईची मागणी…

श्रीगोंदा दिनांक १४ मार्च :
श्रीगोंद्यातील रहिवासी आदिवासी पारधी समाजाचे विश्वनाथ मच्छीन्द्र चव्हाण,इरम्या दांड्या काळे,कुसुम इरम्या काळे,शकुंतला इरम्या काळे,विलास इरम्या काळे यांच्या वारसाने आलेल्या गट क्रमांक २२५५ या जमिनीत हे सर्व जमीन वहीत करून आपला व कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालवतात.या जमिनीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चे १३२ केव्ही चे चालू कामांतील अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या या कार्यक्षेत्रातून चालल्या आहेत.संबंधित जमिनीत एम.एस.इ.बी.कंपनीचा ह्या विद्युत वाहिन्यांचा मनोरा उभारण्यात आला आहे.यामुळे या कुटुंबाच्या जमिनीचा बराचसा भाग हा या कंपनीच्या मानोरा च्या वापरात आला आहे.या कामाची पूर्तता करतेवेळी कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चव्हाण व काळे कुटुंबातील लोकांना विचारात घेतलेले नाही.शिवाय,वापरात आलेल्या जागेचा मोबदलाही त्यांना देण्यात आला नसल्याचे या आदिवासी बांधवांचे म्हणने आहे.
त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,श्रीगोंदा शहरातील सध्या वास्तव्यास असलेल्या आमच्या गट क्रमांक २२५५ या वडिलोपार्जित जमिनीत आम्ही आमजे व आमच्या कुटुंबातील लोकांची उपजीविका चालवतो आहे.या क्षेत्रात आमच्या संबंधितांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या नसून दिशा ठरल्या नाहीत.असे असतांनाच विद्युत वितरण कंपनी चा १३२ केव्ही अतिउच्च विद्युत दाबाच्या वाहिनीचा मनोरा उभारला असून,सदर मनोऱ्या पासून तीन ते चार गुंठे शेतजमीन कायमस्वरूपी पडीक पडणार आहे.आमचे भविष्यात कधीही भरून येणार नाही असे नुकसान यामुळे होणार आहे.तसेच आम्हाला वीज वितरण कंपनी कडून कसलिही नुकसानभरपाई मिळालेली नाही.आम्ही आदिवासी समाजाचे असून आम्हाला या जमिनी व्यतिरिक्त उदरनिर्वाहासाठी कोणत्याही प्रकारचे साधन नाहि. सदर प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानभरपाई देण्याविषयीची मागणी जिल्हाधिकारी (अहमदनगर),तहसीलदार(श्रीगोंदा),विभागिय आयुक्त(नाशिक),एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प(अकोले),मुख्य अभियंता(वीज वितरण कंपनी, अहमदनगर),कार्यकारी अभियंता(वीज वितरण कंपनी, (कर्जत) यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कारवाईस विलंब झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading