अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचाच झेंडा फडकणार – अ‍ॅड. अरुण जाधव…

श्रीगोंदा दिनांक १ एप्रिल :-
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचाच झेंडा फडकणार असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकरराव आव्हाड यांच्या निवडणूक प्रचार नियोजनासाठी श्रीगोंदा येथील बालाजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 
जेष्ठ कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कांतीलाल कोकाटे, समन्वयक प्रमोद काळे, भारिप चे तालुकाध्यक्ष संतोष जौजांळ, महेंद्र थोरात, सुनिल फाजगे, अतुल आखाडे आदी यावेळी उपस्थित होते. 
यावेळी बोलतांना अ‍ॅड. अरुण जाधव म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकरराव आव्हाड यांचा निवडणूक प्रचार वंचित बहुजनांच्या वाड्या,वस्त्या वर जाऊन करावा लागेल. साधन सामुग्री व वेळही कमी आहे. श्रीगोंदा तालुक्यात १५ हजार अधिक आदिवासी, भिल्ल, पारधी, समाजाचे मतदान आहे. त्यांना सोबत घेऊन आपल्या पक्षाचा, आपल्या उमेदवाराचा आणि आपल्या चिन्हाचा प्रचार आपल्याला करावा लागेल. आपल्या विचारांची सत्ता देशात आणि राज्यात आली तर आपले प्रश्न आपोआप सुटतील असे ते म्हणाले. 
उमेदवार सुधाकरराव आव्हाड म्हणाले की, यंदाची लोकसभा निवडणूक ही उमेदवार कार्यकर्ते आणि मतदार यांच्यासाठी ही आव्हानात्मक आहे. एक आंदोलन म्हणून या निवडणुकीकडे पाहून आपण सर्वांनी झोकून देऊन काम केले तर,आपला विजय निश्चित आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे.तेव्हा आपण सर्व मतदारांपर्यंत पोहचण्याचा विचार केला पाहिजे. 
कांतीलाल कोकाटे म्हणाले, श्रीगोंदया तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय प्रचार केला पाहिजे. त्यासाठी काष्ठी, कोळगाव, बेळवंडी, आढळगाव, मांडवगण, घोगरगाव, काष्ठी, येळपणे, टाकळी, कडेवाडी, भाणगाव, चिंभळा, लोणी व्यंकनाथ, ढवळगाव, देवदैठण या मोठ्या गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका व मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या पाहिजेत. 
यावेळी सुरेश चव्हाण, संतोष जौजांळ, सुनिल फाजगे, अतुल आखाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रमोद काळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संतोष जौजांळ यांनी आभार मानले. बैठकीनंतर उमेदवार सुधाकरराव आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह श्री संत शेख महंमद महाराज समाधीचे दर्शन घेतले. या बैठकीस चंपालाल घोडके, शरद काळे, आसाराम काळे, दत्तात्रय सोनवणे, दिवाण भोसले, संतोष भोसले, अनिल थोरात, भारत घोडके, डाबर भोसले, तनवीर शेख, संतोष आल्हाट, राहुल छत्तीशे, सतिष आल्हाट, उमेश वेताळ सह श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading