लोकसभा आचारसंहिते दरम्यान,सर्वेक्षण पथकाची गव्हानवाडी येथे कारवाई.२ लाख ३४ हजार रुपये जप्त …

श्रीगोंदा दिनांक ३ एप्रिल:
लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने अहमदनगर लोकसभा मतदार संघातील,श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाअंतर्गत आचारसंहिता बाबत कोणतेही उल्लंघन होऊ नये यासाठी,एकूण ४ भरारी पथक,४ स्थिर सर्वेक्षण पथक ,१ व्हिडीओ सर्वेलन्स पथक नेमणूक करण्यात आले आहेत.
त्यानुसार,वरील स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक २ यांनी गव्हाणवाडी येथील चेक पोस्ट वर दिनांक २मार्च रोजी वाहनांची तपासणी करीत असताना.एम.एच.१६ ए.बी.४७४४ या वाहनामध्ये रुपये २,३४,४०० इतकी रक्कम आढळून आली आहे.याबाबत चौकशी केली असता,सदरची रक्कम भवन कुक्कुमल तलरेजा रा.अहमदनगर यांचेकडे कुठून आली याबाबत त्यांनी पुरावे सादर केले नाहीत . त्यामुळे,सदरची रक्कम पुढील चौकशी होईपर्यंत(जिल्हा कोषागार कार्यालय,अहमदनगर)येथे श्री.पुंड,(उपकोषागार अधिकारी श्रीगोंदा)यांच्या मार्फत जमा करण्यात आली आहे.
सदरच्या पथकात,(पथक प्रमुख) व्ही.एस.पवार,डी.आर. पठारे,(पोलिस नाईक)विलास जगताप,(पोलिस कॉन्स्टेबल) हे होते.
अशाच प्रकारे श्रीगोंदा मतदार संघात,आचारसंहिता भंग होत असेल तर? आचारसंहिता बाबत कठोरपणे अंमल बजावणी केली जाणार असल्याची माहिती श्री.अजय मोरे (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी),तसेच श्री.महेंद्र माळी,(तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीगोंदा)यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading