श्रीगोंदा दिनांक ६ एप्रिल: श्रीगोंदा तालुक्यातील बहुतेक भागत नदीपात्रातूंन अवैद्य वाळू तस्करी चालू आहे.दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधु यांनी जिह्वा पोलिसांची सूत्रे हाती घेतल्या पासून जिल्हयातील अवैद्य धंद्यावर व वाळू तस्करीवर मोठया प्रमाणात आळा बसल्याचे निदर्शनास येते आहे.सिंधू यांनी जिल्ह्यातील तालुका निरीक्षकांना आदेश देत सर्व अवैद्य व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे.त्यानुसार स्थानिक प्रशासन कारवाईस लागल्याचे स्पष्ट होतं आहे.
दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री २ वाजता पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून निरीक्षक जाधव यांनी दोन पंचांना बोलावून,पथक नेमनुक करून,भिमापात्रातील चालू असलेल्या वाळू उपाश्यावर कारवाई केली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील निमगांव खलू या श्रीगोंदा पो.स्टे.हद्दीत हि कारवाई करण्यात आली आहे.यात एकूण ४० लाख १२ हजार रुपये किमतीचे वाहने व गौन खणीज ताब्यात घेण्यात आले आहेत.
१५ लाख रुपये किमतीचा एल.टी.केज कंपनीचा जे.सी.बी.,१५ लाख रुपये किंमतीचा केज constractio,५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ५ लाख सहा हजार रुपये किमतीचा वाळू सह विना क्रमांकाचा ट्रॅक्टर श्रोगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
आज दिनांक ६ एप्रिल रोजी याप्रकारे अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या रमेश परमशिंग जाधव (वय २४ वर्षे),गणेश कांबळे (फरार),सोमनाथ गोरख शिंदे,(वय वर्षे २३),भीमा रमेश शिंदे(फरार),सोमनाथ गोरख शिंदे,(वय वर्षे २३)यांच्या सह विना क्रमांकाच्या ट्रकच्या मालक व ड्रायव्हर यांनी संगनमताने स्वतःच्या फायद्या साठी वाळू चोरी करून, नेली असल्याने त्यांच्या विरोधात शासकीय फिर्यादी प्रकाश वाघ यांच्या फिर्यादी वरुन भा.दं.वि.कलम ३७९,३४,३/१५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.