संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघाच्या कार्यकृती व विचारांचे मढेवडगावात आचरण ! भगवा ध्वज उभारून राजे संभाजीनां अभिवादन…

मढेवडगाव,श्रीगोंदा, दिनांक ६ एप्रिल:

संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघाच्या कार्यकृती व विचारांचे मढेवडगावात आचरण ! भगवा ध्वज उभारून राजे संभाजीनां अभिवादन…

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव गावामध्ये भगवा ध्वज हीच आमची गुढी ! शिवविचार हेच आमचे धोरण ! या तत्वां नुसार,गुढी ऐवजी भगवा ध्वज उभारून सर्वांनी आज दिनांक ६ एप्रिल रोजी शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले यांना अभिवादन केले आहे.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रथम सुरू केलेल्या,या उपक्रमाचे अनुकरण करून,मढेवडगाव येथील ग्रामस्थांनी, गुढी पाडव्याची पालथा तांब्या-साडी-चोळी आणि त्यामध्ये बांबू अशा प्रतिकात्मक रुढी परंपरेच्या गुढ्या न उभारता. वारकरी संप्रदायाची गुढी भगव्या रंगाची आणि गौतम बुध्दांनी दिलेली भगवी पताका व छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा भगवा ध्वज उभारून,गावकऱ्यांनी खऱ्या अर्थाने या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आप-आपल्या घरांवर भगवी पताका लावून,एक क्रांतिकारक परिवर्तन केले आहे.या परिवर्तनाच्या नांदीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून,त्यांचे सामान्य जनतेकडून कौतुक केले जात आहे.

मढेवडगाव मधील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने विचारांची ही विश्वास हर्तता नक्कीच नव्या विचारांच्या वाटा निर्माण करू पाहत आहेत.असे वाटतं असल्याचे मत ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने माध्यमांना याविषयी माहिती देतांना नमूद केले आहे.

              

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading