दांडीबहाद्दर ८७ कर्मचार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार…

दांडीबहाद्दर ८७ कर्मचार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार…
श्रीगोंदा, दिनांक,७एप्रिल :लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचार्‍यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची  माहिती (महेंद्र माळी)सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीगोंदा यांनी दिली.
लोकसभा निवडणूक २०१९ मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी,श्रीगोंदा मतदारसंघातील सुमारे २०४८ अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज आणि तुळसीदास मंगल कार्यालय येथे EVM आणि VVPAT बाबत प्रत्यक्ष हाताळणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा पहीला टप्पा आज पूर्ण झाला.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. याकरीता श्रीगोंदा येथे एकूण ३४५ मतदान केंद्रासाठी ३०४८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहील्या टप्प्यातील प्रशिक्षण आज घेण्यात आले आहे.मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ही सर्व उपकरणे व्यवस्थित हाताळता यावी, त्याचबरोबर निवडणूक विभागाच्या नियमानुसार मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे नियम त्यांना माहित असणे आवश्यक आहे. मतदाना दरम्यान निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी,कर्मचार्‍यांनाच पार पाडावी लागते. त्यामुळे,निवडणुकीच्या कामावर नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचार्‍याला प्रशिक्षण देणे आवश्यक राहते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजय मोरे यांनी, यंदा निवडणुक प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले असल्याचे नमूद करीत त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूकित मतदान प्रक्रिया राबवताना व्हीव्हीपॅट या नवीन मशीनचा समावेष करण्यात आले असून,यामुळे मतदाराला मतदानाची खात्री पटणार आहे.या मशीनच्या संदर्भात(अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी) महेंद्र माळी यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. प्रत्यक्ष मशीन हाताळून प्रात्यक्षिकाद्वारे मशीनची कार्यप्रणाली समजून देण्यात आली. 
परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाला दांडी मारली आहे.अशा दांडीबहाददर ८७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून,समाधानकारक खुलासा न दिल्यास,त्यांच्यावर बडतर्फीचीही कारवाई करण्याचा इशारा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील निवडणुक विभागाने दिली आहे. त्याबाबत कर्मचारी यांची निलंबन व सेवेतून बडतर्फी होऊ शकते.असे नमूद करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक प्रशिक्षण वर्गासाठी अनुपस्थित राहणार्‍या व दांडी मारणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध लोक प्रतिनिधी अधिनियम,१९५१ मधील कलम १३४ नुसार व भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदी नुसार,नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात येणार. सदर गुन्ह्यामध्ये अपराध सिद्धीनंतर सश्रम कारावास, दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.तसेच शासकीय नोकरी मध्ये असलेल्या लोक सेवकांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपील),नियम १९७९ मधील नियमांनुसार निलंबन व सेवेतून बडतर्फी अशीही शिक्षा होऊ शकते.असे प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading