शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी गणेश शेळके तर श्रीगोंदा तालुका प्रमुख पदी भाऊसाहेब गोरे..
श्रीगोंदा दिनांक ७ एप्रिल : शिवसेनेचे (दक्षिण जिल्हा प्रमुख) प्रा.शशिकांत गाडे,(उत्तर जिल्हा प्रमुख) रावसाहेब खेवरे,(अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक) योगीराज गाडे,(सभापती) रामदास भोर,(नगर तालुका प्रमुख) राजू भगत यांच्या उपस्थितीत पारनेर येथील गणेश शेळके यांची उपजिल्हा प्रमुखपदी तर श्रीगोंदा तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब गोरे यांची निवड अहमदनगर जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केली असून निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले
या निवडीबद्दल
पारनेर येथील(युवक नेते)पारनेर,(पंचायत समितीचे सभापती)गणेश शेळके यांचे युवकांचे संघटन कौशल्य व पारनेर तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क व पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय औटी यांचे निकटवर्तीय आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन,त्यांची उपजिल्हा प्रमुख पदी निवड करताना त्यांच्यावर श्रीगोंदा तालुक्याचे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेनेचे (ज्येष्ठ नेते)भाऊसाहेब गोरे गेली ३५ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहून,शिवसेना पक्ष तालुक्यात जिवंत ठेवण्याचे काम केल्याने व वेळोवेळी पक्षाच्या आंदोलनात पक्षाच्या मेळाव्यात सक्रिय सहभाग घेतला.वयाची ७५ वर्ष पार करून,सुद्धा तरुणांना लाजवेल असे काम भाऊसाहेब गोरे यांनी केल्याने,श्रीगोंदा शिवसेनेचे तालुका प्रमुख पदी निवड करून,भाऊसाहेब गोरे यांनी केलेल्या कामाचा शिवसेनेने एक प्रकारे सन्मानच केला आहे.
या निवडीबद्दल(विधानसभेचे उपाध्यक्ष)आ.विजयराव औटी,(राज्याचे विरोधी पक्षनेते)आ. राधाकृष्ण विखे पाटील,(पालकमंत्री)प्रा.आ. राम शिंदे,शिवसेनेचे(संपर्कप्रमुख)भाऊ कोरगावकर,शिवसेनेचे(उपनेते)अनिल भैया राठोड,(माजी मंत्री)बबनराव पाचपुते,(जिल्हाप्रमुख)शशिकांत गाडे ,रावसाहेब खेवरे (जिल्हाप्रमुख) राजेंद्र दळवी सह तालुक्यातील शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.