प्रहार अपंग संघटनेच्या वतीने चालक वाहकांना पाण्याच्या पिशव्यांचे वाटप..

आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे आयोजकांचे आभार मानतांना..

श्रीगोंदा,दिनांक ८ एप्रिल:
आज दिनांक ८ एप्रिल रोजी श्रीगोंदा येथील प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा बस आगारातील सर्व चालक व वाहक यांना पाणि थंड करणारी पिशवी भेट दिली आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके,माजी नगरसेवक दादा औटी हे उपस्थित होते.
यावेळी श्रीगोंदा आगाराचे आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी या कार्यक्रमात आयोजकांचे आभार मानले आहेत. त्यांनी याप्रसंगी बोलतांना वातावरणात झालेल्या नैसर्गिक बदलाविषयी माहिती दिली.चालक वाहक अश्या वातावरणात आपल्या कर्तव्यावर असतांना होणारा त्रास, त्यांनी नमुद केला आहे.त्यांना या उन्हाच्या कालखंडात आयोजक प्रहार अपंग संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या पाण्याच्या पिशवीमुळे प्रवासा दरम्यान चालक व वाहकांना दिलास मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या कार्यक्रमात प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे,हरिश्चंद्र खामकर,सुरेश गलांडे,माधव बनसुडे, विजय शेंडगे,नितीन शेंडगे,दिलीप औटी,आबासाहेब हिरडे,सतीश व्हराडे,बलभीम हिरडे,ज्ञानदेव भैलूमे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर वाहतूक निरीक्षक रोहित रोकडे, कार्यशाळा प्रमुख प्रशांत होले,आगार लेखाकार अवधूत कांबळे,वाहतूक नियंत्रक शंकर ढवळे,चालक,वाहक तसेच प्रवाशी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
Related