तालुक्यातील राजकारणी नाहाटाला सासवड मधील NBW वॉरंट मध्ये श्रीगोंदा पोलिसांनी घेतले ताब्यात…श्रीगोंद्यातील दोन बेलेबल आणि तीन नॉन बेलेबल वॉरंट वर कारवाई का नाही ?
श्रीगोंदा दिनांक ९ एप्रिल:
श्रीगोंदा तालुक्यातील राजकारनात त्याच्या भाषण शैलीने व कार्याने एकेकाळी नावारूपाला आलेले व्यक्तीमत्व,बाळासाहेब नाहाटा पुन्हा एकदा कायद्याच्या चकाट्यात सापडले आहेत. दिनांक ८ एप्रिल रोजी पुण्यातील एका इस्मानकडून नाहाटा वर १३८ ची कारवाई करण्यात आली असल्याचे समजले आहे.त्यामुळे माननीय सासवड न्यायालयाने बाळासाहेब नाहाटा यांच्यावर एन.बी. डब्लू.(NBW)नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते .त्यानुसार बाळासाहेब नहाटा यांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून,त्यांना माननीय सासवड न्यायालया समोर आज हजर करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी,गावातील समाजकारण ते राजकारण, त्याचबरोबर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सभापती,त्यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेत सहभागा साठी संघर्ष सर्व श्रीगोंदा वासीयांना ज्ञात आहेच.श्रीगोंदा तालुक्यातील राजकारनातील दिगग्ज राजकारन्यानां राजकीय विरोध,त्यातून राज्यपातळीवरील पद,आदिवासी प्रकरण यातून नहाटा सर्वांना सर्वसृत आहेत.यानंतर टी.डी.आर.च्या विषयांत हे सर्वत्र चर्चेत आले आणि पुन्हा त्या विषयावर पडदा पडल्याचे सर्वांना माहीत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील छोट्या गावांतून राज्य पातळीवर वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून नावारूपाला आलेले हे व्यक्तीमत्व. आज या विषयाने पुन्हा चर्चेत आले आहे. श्रीगोंदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील एकूण पाच गुन्ह्यात माननीय न्यायालयाने वारन्ट बजावले असतांना.नहाटा ला श्रीगोंदा पोलिसांनी यापूर्वी ताब्यात का घेतले नाही ?हाही नहाटां च्या या वारन्ट निमित्ताने समोर आलेला विषय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गिरमकर विरुध्द नहाटा,वृद्धेश्वर विरुध्द नहाटा,या गुन्ह्यांत बेलेबल वॉरंट (BW) असून,पितळे विरुध्द नहाटा या व्यतिरिक्त दोन विषयांत NBW चे वॉरंट असतांना श्रीगोंदा पो.स्टे. नी कारवाई का केली नाही? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मात्र नहाटाला चालू राजकीय धामधुमीतुन पोलिसांनी पथक नेमून अथक परिश्रम करून पकडले असल्याचे दिसून येत आहे.