विभागीय आयुक्त नाशिक विभाग तथा दिव्यांग मतदार निरीक्षक यांची श्रीगोंद्यातील मतदान केंद्राना भेट..

विभागीय आयुक्त नाशिक विभाग तथा दिव्यांग मतदार निरीक्षक,यांची श्रीगोंद्यातील मतदान केंद्राना भेट..
श्रीगोंदा,दिनांक,९ एप्रिल :
मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार PWD (Person with Disabilities) मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जनजागृती निर्माण करने, त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून,लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाअंर्तगत असलेल्या एकूण ३४५ मतदार यादि भागामध्ये दिव्यांगासाठी Welfare Plan बनविन्यात आला आहे.
जनगणना २०११ नुसार देशातील २.६८ कोटी (२.२१%) लोक हे दिव्यांग आहेत. त्यांचा लोकशाहितील सहभाग वाढविन्याचा उद्देशाने तसेच Accessible Elections  च्या पुर्ततेसाठी मा.भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे.या अनुषंगाने २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात दिव्यांगाची मतदार नोंदणी तसेच,प्रत्यक्ष मतदानातील सहभाग वाढविन्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 
त्याचाच एक भाग म्हणून,श्रीगोंदा मतदार संघातील दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी पुरविन्यात येणाऱ्या सोयी सुविधाची तसेच,दिव्यांग मतदार जनजागृतीसाठी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मा. श्री. राजाराम माने(विभागीय आयुक्त,नाशिक विभाग),(दिव्यांग मतदार निरीक्षक) यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगांव, बेलवंडी येथील मतदान केंद्राना भेटी दिल्या.
श्रीगोंदा मतदार संघात एकूण १३४१ दिव्यांग मतदार आहेत. त्याबाबत अजय मोरे( सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी)यांनी दिव्यांग मतदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली. दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर पोहोच करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मॅग्नीफायर शीट तसेच ब्रेल लिपिची मतपत्रिकेची व्यवस्था केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच,प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे.
सदर भेटी वेळी अजय मोरे( सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी)संजय बागडे(प्रांताधिकारी),महेंद्र माळी(अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी), उबाळे(समाज कल्याण अधिकारी),प्रशांत काळे (गट विकास अधिकारी)उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading