लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली श्रीगोंदा अभिलेख कक्ष्याचा बेबनाव…वयोवृद्ध नागरिकांची आर्थिक तसेच मानसिक हेळसांड..
श्रीगोंदा दिनांक ११एप्रिल: तहसील कार्यालयाच्या आवारात तहसील कार्यालयाचे रेकार्ड रूम म्हणजे अभिलेख कक्ष आहे.या ठिकाणी सर्व प्रकारच्या अभिलेखांचे जतन करून मागणीनुसार त्याच्या प्रमाणित प्रत दिल्या जातात.या मुळे अभिलेख कक्षात फेरफार सात बारा उतारे जन्म मृत्यू नोंद यासाठी सर्व सामान्य नागरिकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
मात्र,सध्या लोकसभेच्या इलेक्शनचे काम चालू असून,इलेक्शनच्या नावाखाली कर्मचारी कामाच्या ठिकाणी हजर नसतात.तसेच,गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा अभिलेख कक्ष बंद असून,तालुक्यातील शेतकरी तसेच वयोवृद्ध नागरिक यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.याबाबत अभिलेख कक्षाचे कर्मचारी कदम यांना विचारले असता,त्यांनी इलेक्शनच्या मतपेट्या आणण्यासाठी नगर येथे तहसीलदार यांच्या आदेशाने आलो असून,कर्मचारी वर्ग कमी असल्याने अभिलेख कक्ष बंद करून यावे लागले आहे.त्यामुळे,सध्या अभिलेख कक्षातील या सावळे गोंधळाने सर्व सामान्य नागरिक मात्र पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. अभिलेख कक्षाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी तहसीलदार यांच्याकडे करूनही काही उपयोग होत नसल्याने,नागरीकाना एका कामासाठी अनेक चकरा माराव्या लागत आहेत.त्यामुळे, वेळेबरोबर त्याचा पैसाही व्यर्थ होताना दिसत आहे.तसेच स्वतःच्या फायद्यासाठी इंग्रजकालीन दस्तावेजांमध्ये हेरगिरी करण्याचे प्रकारही अनेकदा उघडकीस आल्याच्या घटना ताज्या असतानाही,या गंभीर बाबीकडेही(तहसीलदार)महेंद्र माळी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तहसीलदार याच्या कामकाजावर नागरीकांतून संताप व्यक्त होताना दिसत आहे.