श्रीगोंदा कुकडी कार्यकारी अभियंता कार्यालयाला महात्मा फुले जयंतीचा विसर..

श्रीगोंदा, दिनांक १२ एप्रिल :-क्रांतीसुर्य जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११ , इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेेेकखख समाज सुुधारक होते. त्यांनी सत्य शोधक नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. दि ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने सर्वच शासकीय कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी करण्याचा शासकीय परिपत्रकानुसार निर्णय घेतला असतांना, श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी कार्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात अधिकाऱ्यांना विसर पडला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले असून, शासकीय इमारतीला रंगकाम चालू असल्यामुळे सर्व सामान अस्तवस्त्य पडलेले असल्याने यावेळेस चुकून महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्याचे विसरलो असून,त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणून त्यांनी आपली बाजू मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारी परिपत्रक असताना,जयंती साजरी केली नसेल तर कारवाई करणार – हेमंत धुमाळ ..
सरकारचे परिपत्रक असताना,श्रीगोंदा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जयंती का साजरी केली नाही?याबाबत अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी सांगितले की सरकारचे परिपत्रक असताना जर महात्मा फुले यांची जयंती साजरी केली नसेल.तर,ही निंदनीय बाब आहे.त्यांचेवर कारवाई केलीच पाहिजे.असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading