श्रीगोंदा बस आगारात कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न..


श्रीगोंदा दिनांक १३ एप्रिल:
श्रीगोंदा शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी श्रीगोंदा बस आगारात,आगार व्यवस्थापकांच्या कार्यलयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महापुरुषांच्या जिवण त्याग आणि संघर्षाची माहीतचा व आठवनीचा आढावा घेण्यात आला.
जयंतीच्या निमित्ताने श्रीगोंदा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रीगोंदा येथील डेपोमध्ये टाटा ट्रस्ट च्या उपक्रमा अंतर्गत”इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई” यांनी श्रीगोंदा एस.टी.डेपो मधील कर्मचाऱ्यांची (चालक,वाहक,स्वछता कर्मचारी)यांची मोफत वैद्यकीय तपासणी करून घेतली. दि.११ एप्रिल रोजी आगारात इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई येथील डॉक्टरांच्या टीमने,कर्मचाऱ्यांची मोफत तोंडाची तपासणी केली व त्यांना कॅन्सर या आजाराची सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी डॉ.अमनदीप सिंग(कॅम्प को-ओर्डीनेटर),किरण वाघमारे,अजय जगताप, सुनीता खराडे,प्रवीण शिंदे(श्रीगोंदा आगार व्यवस्थापक),रमेश धाडगे हे हजर होते.
या कार्यक्रम अंतर्गत चालक ,वाहक व आगारातील कर्मचाऱ्यांना माणसाच्या शारीरात कॅन्सर च्या लागणी संदर्भात व त्यावरील उपाय व काळजी संदर्भात “इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई”येथील डॉक्टरांच्या टीमने सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
सामान्य माणसांच्या तोंडाला कॅन्सरच्या लागणीचे प्रमाण,इतर कॅन्सरच्या तुलनेत जास्त असल्याचे,यावेळी डॉक्टरांनी सांगितले आहे.टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चालू केलेल्या या उपक्रमात “इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई” ने राज्यातील सर्व बस आगारात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची (चालक, वाहक,व इतर सर्व कर्मचारी)यांची कॅन्सर ची तपासणी करणे व त्यांना याविषयी जागृत करून सविस्तरपणे मार्गदर्शन करणे हे संस्थेचे मुख्य उद्देश असल्याचे यावेळी डॉ. अमनदीप सिंग यांनी माध्यमांस दिलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे.
या उपक्रमातून सामान्य लोकांना जे आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त आहेत त्यांना या संस्थेच्या उपक्रमाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत,श्रीगोंदा बस आगाराचे आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले आहे.शिवाय या राबविण्यात आलेल्या शिबिराचे व डॉक्टरांचे विशेष आभारही त्यांनी मानले आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading