दिनांक ३१ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हान पूजन व गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थितीत बोलतांना महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलतांना मंत्री मुंडे म्हणाले की, येथे उपस्थित शेतकरी बांधव हे ऊसाला भाव किती मिळणार.? यापेक्षा राहुल दादावर खरच प्रेम आहे. म्हणून, बसलेले आहेत.

ते म्हणाले की, काय प्रसंग आलायं..? एका ऊसतोड कामगारांच्या पोराला कारखान्याच्या गळीत हंगाम समारंभात शुभारंभ करण्याची संधी मिळतेय..! तुमच्या समोर येऊन बोलायची परिस्थिती निर्माण होते…! हे सारं कोणामुळे शक्य झालं असेल.? तर, फक्त देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे असे ते म्हणाले.

पुढे बोलतांना कोरोना आपत्तीबाबत त्यांनी चर्चा केली. त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना, मजुरांना, कामगारांना या भागात येऊन काम करावा लागत. कारण या भागांमध्ये मुबलक पाणी आहे. असे त्यांनी नमूद केले. दोन वर्षात आलेल्या संघटाबाबत तसेच, वादळ, आपत्ती, अतिवृष्टी, पूर या संकटांना राज्य शासन धीराने सामोरे गेल्याचे त्यांनी सांगितले. पुढे लखिमपुर येथील शेतकऱ्यांच्या दुर्घटनेबाबत ही त्यांनी घटनाक्रम व परिस्थिती सांगितली. आलेल्या सर्व आपत्तीमध्ये आघाडी सरकारने योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना मदत करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे (अध्यक्ष) राहुल दादा जगताप यांनी उपस्थितीतांना संबोधित केले. कुकडी कारखाना अनं सर्वसामान्य शेतकऱ्यांचे एक नातं असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्यासह तालुक्यातील विविध विषय त्यांनी यावेळी मांडले. प्रस्ताविक व सूत्रसंचालन हरिदास (आबा) शिर्के यांनी केले. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तामामा भरणे, घनश्याम आण्णा शेलार, राणीताई लंके, संग्राम भैया जगताप इत्यादिंची भाषणे झाली. 18th Gawan Pujan and Ghalit season of Kukdi Co-operative Sugar Factory has started.

या कार्यक्रमासाठी बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र फाळके, दीपक भोसले, बाळासाहेब नाहाटा, केशवभाऊ मगर, संपत भाऊ मस्के, बाळासाहेब दुतारे, संजय आबा जामदार, ऋषिकेश गायकवाड, संजय आनंदकर सर, अभिलाष घिगे, मनोज कोतकर, दादा दरेकर, दादासाहेब औटी, गौतम घोडके, प्रशांत गायकवाड, शुभांगी ताई पोटे, शंकर शेठ पाडळे, स्मितल भैय्या वाबळे सह पदाधिकारी, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्रोत:(दिनांक ३० ऑक्टोबर २१ रोजी आयोजित गव्हान पूजन व गळीत हंगाम कार्यक्रम, कुकडी कारखाना)
