श्रीगोंद्यात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांची कारवाई..! ८९.५ किलो वजनाची ८ लक्ष ९५ हजार रुपयांची झाडं हस्तगत..!

दिनांक ३० ऑक्टोबर, श्रीगोंदा:

शहरातील जगताप वस्ती, दत्तवाडी व लोखंडवाडीच्या मधील श्रीगोंदा शिवारात गांजाच्या झाडाची लागवड करून, स्वतःचा फायद्याकरता विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने अरुण हरिभाऊ जगताप (वय वर्ष ५६) व बाळू हरीभाऊ जगताप (वय वर्षे ५९) हे दोघे आढळून आल्याने पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील दत्तवाडी लोखंडवाडी या श्रीगोंदा शहरातील परिसरात नमूद दोघांनी गट नंबर ७०० व ७०१ या क्षेत्रात स्वतःचा आर्थिक फायद्याकरता विनापरवाना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारची बंदी असलेले नशा कारक एकूण १९ लहान-मोठी अशी ८९.५०० किलो वजण्याची ८ लाख ९५ हजार रुपये किमतीची गांजा वनस्पती लागवड करून, स्वतःच्या ताब्यात बाळगताना पोलिसांना मिळून आले.

म्हणून, पोकॉ डी.बी टाके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अरूण जगताप व बाळू जगताप या दोघांवर एन.डी.पी.एस १९८५ चे कलम २० (क)(ख) प्रमाणे पोहेकॉ. एम के गावडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. Police action against cannabis farmers in Shrigonda ..! Trees weighing 89.5 kg and worth 8 lakh 95 thousand rupees ..!

नमूद ठिकाणी अण्णासाहेब जाधव (उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत भाग), सह रामराव ढिकले (पोलीस निरीक्षक) श्रीगोंदा पोलीस स्टेशन व दिलीप तेजनकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक) श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी भेट दिली आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading