अग्नीपंख फौंडेशनची राज्यातील २१ बाल वसतीगृहांना धान्यरुपी मदत … (उपक्रमात ६८ शाळेतील २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग)

श्रीगोंदा, दिनांक २१ एप्रिल :
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरित काम करीत असलेल्या,अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा तालुक्यातील ६८ शाळा,विद्यालयात एक मूठ अनाथांसाठी हा उपक्रम राबविला.या उपक्रमातून जमा झालेले धान्य राज्यातील २१ अनाथ, मतीमंद, वंचित व दीन-दलित मुलांच्या वसतीगृहांना वाटप करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक प्रकाश कुतवळ व मोहनराव आढाव यांचे घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आला. दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना,श्रीगोंदेकरांना भरभरून प्रतिसाद दिला.यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू ललीता बाबर यांचे सह अनेक दानशूर व्यक्तींनी धान्यरुपी विशेष योगदान दिले.या उपक्रमात सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
यावर्षी ५० ते ५५ किलो वजन असलेले २९० बॅग धान्य जमा झाले गेल्या वर्षी पेक्षा यंदा ३० बॅग जादा धान्य जमा झाले गेल्या वर्षी १४ संस्थांना मदत केली.यावर्षी २१ संस्थांना धान्य रुपी मदतीचा हात दिला आहे.या मध्ये दोन बाल वारकरी संस्थांचा समावेश आहे.
राज्यातील अनाथ मुलांची भुक भागविण्याच्या भावनेतून अग्नीपंख फौंडेशनने एक मुठ अनाथांसाठी हा चांगला उपक्रम हाती घेतला.श्रीगोंद्यातील पालक शिक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.मी या सेवाभावी उपक्रमात मी दरवर्षी योगदान देणार आहे.
:(ललीता संदीप भोसले बाबर आंतरराष्ट्रीय धावपटू).
अग्नीपंख फौंडेशन ने एक मुठ अनाथांसाठी अतिशय चांगला उपक्रम सुरू केला.यामुळे,विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण होत असताना अनाथ वंचित मुलांची भुक भागविण्याचे समाधान लाभणार आहे.
:(गुलाबराव सय्यद गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा).
धान्य रुपी सेवा दिलेल्या संस्था:-
सेवालय हासेगाव लातुर,शाहु बोर्डीग सातारा,बाल अविश्रांती दौड,प्राजक्त मतीमंद विद्यालय सुपा ता.बारामती,सार्थक बालभवन आंबळे ता. पुरंदर,महामानव बाबा आमटे श्रीगोंदा,महात्मा फुले आश्रमशाळा घारगाव,युगंधर आदिवासी प्रकल्प बारडगाव ता.कर्जत,संकल्प बालसदन राशीन ता.कर्जत,स्नेहप्रेम वसतीगृह कर्जत जि.अहमदनगर, निवारा बालगृह जामखेड जि.अहमदनगर,बालग्राम गेवराई जि.बीड,स्नेहालय अनगर,माऊली प्रतिष्ठान अ.नगर, अनामप्रेम अनगर,स्नेहग्राम कोरफळे ता.बार्शी,श्री.दत्त योगीराज बाल वारकरी कोंभळी ता.कर्जत,गुरुप्रीत बाल वारकरी टाकळी लोणार ता.श्रीगोंदा,श्रावणबाळ बालसंस्कार केंद्र इंदापुर जि.पुणे,ज्ञानप्रबोधिनी मतीमंद विद्यालय कोर्टी ता.करमाळा,आ.सुभाष कुल मतीमंद विद्यालय दौड,जि.पुणे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading