नगर दौंड रस्त्यावर बेलवंडी फाटा येथे मोटारसायकल व मालट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन १ जण जागीच ठार..

श्रीगोंदा, दिनांक २२ एप्रिल:
२२ एप्रिल रोजी कोळगाव येथील योगेश पोपट वेठेकर (वय ३७) रा.वेठेकरवाडी हा बेलवंडी येथे सकाळी ६.३० वाजता मोटारसायकल नंबर एम.एच१४ ए.टी ६७२८ वरुन जात असताना,पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रक नंबर एम.एच.१६ सी.सी ६६६९ ने धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीस्वार योगेश याच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात अपघातात मृत्यू पावलेल्या योगेश चा मृतदेह आणून शवविच्छेदन करण्यात आले.त्यांनतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत अजित रतन नलगे यांच्या फिर्यादी वरून, मालट्रक चालकाविरुध्ह गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भापकर डी.एस हे करत आहेत.
नगर दौंड रस्त्याचे काम चालू आहे.या रस्त्याचे कामं करणाऱ्या ठेकेदाराने,कोणतेही दिशादर्शक फलक लावले नसल्यामुळे, याठिकाणी निस्पाप माणसांसह वन्य जीवांचे ही सतत अपघात होत असतात.या बाबतीत ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे .

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading