दिनांक २५ एप्रिल रोजी श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे यात्रे निमित्ताने हरिभाऊ बडे सह शिवकन्या बडे नगरकर या लोकनाट्य तमाशाचे कलाकार कला सादर करण्यासाठी आले होते. यानुसार टाकळीत तमाशाचा स्टेज तयार करण्याचे काम चालू असतानां, येथील काही लोक दारू पिऊन याठिकाणी तमाशा कलावंतांना त्रास देऊ लागले. काही जाणकार मंडळींनी या लोकांना विनंती करीत तेथून जाण्यासाठी सांगितले.मात्र,पिलेल्या या इसमानीं तेथेच स्टेज वर धिंगाणा घालण्यास सुरवात केली.समजून सांगणाऱ्या लोकांचे म्हणणे न जुमानत त्यांनी या तमाशा कलावंतांना लाकडी काठ्या व लोखंडी रॉडणे जबरी मारहाण केली. महिला फिर्यादीनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी संदीप सुरेश सुडगे , अशोक माऊली सुडगे,अनिकेत पावलस सुडगे,संजय दानवे सुडगे,शांताराम सुडगे,गणेश कैलास जगदाळे,सचिन सुरेश सुडगे,नीतीन मल्हारी जगदाळे,व इतर ५ ते ७ इसम राहणार टाकळी लोणार श्रीगोंदा यांच्या विरोधात विनयभंग सह जबरी मारहाण व जीवे मारण्याची धमकी चे गुन्हे दाखल केले आहेत.
टाकळी लोणार येथे घडलेल्या घटनेचा सर्व तमाशा क्षेत्रातील कलाकारांनी निषेध नोंदवला असल्याचे, संभाजीराजे जाधव (महाराष्ट्र तमाशा कलावंत परिषदेचे सदस्य)यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे.
त्याच बरोबर श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष, सतीश शेठ पोखरणा यांनीही याविषयी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.अश्या प्रकारे कलावंतांवर भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई कारण्याची ही त्यांनी मागणी केली आहे.पोखरणा या गावचे रहिवासी आहेत.
टाकळी गावात मनोरंजन करण्यासाठी आलेल्या कलावंतांच्या लहान मुलांवरही झोपेतच काठ्या लाठ्या नी मारहाण करीत,त्यांच्या हात पायांवर गंभीरपणे मारहाण झाल्याने,खोलवर दुखापत होत,हाडं मोडली आहेत. महिलांच्या ही अंगावर गंभीर जखमा व लोखंडी गज व काठीचे व्रण उमटले आहेत.
सचिन रामसिंग चव्हाण, अशोक हरिभाऊ बडे,मुबारक गुलाब जमादार,देवराम सिताराम कांबळे,प्रशिक देवानंद कांबळे,अनिल सुंदरराव बांगर,पप्पू रामदास गोरे,मयूर जालिंदर गोरे,मयूर जालिंदर चव्हाण,अस्लम अब्दुल रहीम बेगमिरझा इत्यादी या हल्ल्यात मारहाण झालेल्या पीडित व्यक्तींची नावे आहेत.
या घटनेत पीडित महिलेच्या फिर्यादी वरून संदीप सुरेश सुडगे व अशोक माऊली सुडगे यांच्यासह वर नमूद सर्व लोकांवर भा.दं.वि.कलम३२६,३५४,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६,सहबालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण कायदा कलम ७ व ८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.