श्रीगोंदयात भा.रि.प.च्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत,रूपालीच्या वैद्यकीय उपचारासाठी केली आर्थिक मदत….

श्रीगोंदा दिनांक ११ मे:
श्रीगोंद्यातील औटीवाडी या शहरालगत असलेल्या लोक वस्तीत रहिवाशी असलेल्या,रुपाली औटी हिचा हृदय व फुफुस प्रत्यारोपनासाठी,अनेकांनी फुल न फुलाची पाकळी या वाकप्रचारा नुसार,मदत करीत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.रुपालीच्या वडिलांनी व आईने केलेल्या अवाहनावर अनेकांनी रूपालीच्या उपचारासाठी आर्थिक सहकार्य देऊ केले आहे.काहींनी रुपालीच्या आजारा संदर्भात स्थानिक वृत्तपत्रांतुन प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या आधारे आर्थिक पाठबळ दिले आहे.
जपान येथील सद्गृहस्थ पुराणे तशेच अमेरिका येथील सप्रे यांनी आर्थिक तरतूद करण्याची भावना,पीडीतेच्या कुटुंबातील लोकांशी व्यक्त केली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील काही व्यापाऱ्यांनीही प्रत्यक्ष भेट घेत या कुटुंबाला आर्थिक बळ दिले आहे.अक्षरशः ५० रुपयांपासून पुढे हजारो रुपयांपर्यंत मदतीचा ओघ या पीडित युवतीच्या उपचारासाठी मिळत आहे.
अश्याच प्रकारे रूपालीच्या आजारा संदर्भात,मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत असलेल्या,(फुले शाहू आंबेडकरी)चळवळीतील कार्यकर्त्यांनी व (भारिप बहुजन महासंघाच्या)पदाधिकाऱ्यांनी १० मे हा,”प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर”यांचा वाढदिवस आपल्याच तालुक्यातील पीडित अल्पभूधारक मराठा समाजाचे शेतकरी रामदास औटी यांची आजारी मुलगी रुपालीच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य देत साजरा करण्याचे ठरविले.
दुष्काळी परिस्थिती असल्याने वाढदिवसाच्या माध्यमातून होणारे अनाठायी खर्च टाळले जावेत.या आंबेडकरांच्या सूचनेला साजेशे सत्कर्म संतोष जौजांळ (तालुकाध्यक्ष भारिप,बहुजन महासंघ श्रीगोंदा)यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रूपालीला मदत करुन,वाढदिवस साजरा केला आहे.(भा.रि.प.चे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष) संतोष जौजांळ,(युवा तालुकाध्यक्ष)महेंद्र थोरात,(भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी)प्रशांत चव्हाण,(युवा जिल्हा संघटक)गणेश थोरात,(तालुका उपाध्यक्ष)मंगेश घोडके,(वंचित बहुजन आघाडी,सचिव)सुनिल फासगे,सह (सामजिक कार्यकर्ते) मनोज रणदिवे,विजय जौजांळ,किरण उबाळे,व प्रेमराज जाधव सह प्रहार संघटनेचे पदाधिकारी नितीन रोही हे याप्रसंगी उपस्थित होते.भा.रि.प.च्या पदाधिकाऱ्यांनी रूपालीच्या घरी जाऊन तिच्या आजारासह उपचाराविषयी घरच्यांशी चौकशी करीत आर्थिक दृष्ट्या सहाय्य केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading