दिनांक २४ जून,श्रीगोंदा:
श्रीगोंद्यातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २५ जणांचे स्त्राव नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी २२ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून, ते २२ जन कोरोना निगेटिव असल्याचे निष्पन्न झाले आहे.
साळवनदेवी येथील पती-पत्नी त्यानंतर साळवनदेवी रोड येथील दोन पुरुष व काळकाई चौक येथील महिला अशा पाच व्यक्ती तालुक्यात कोरोना पॉझिटिव आहेत. या व्यक्ती आरोग्य यंत्रणेच्या निगराणीत असून, दिनांक २२ जून रोजी साळवनदेवी रोड येथील व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ९ जणांचे स्त्राव नमुने तसेच, काळकाई चौक येथील परिचारिका जी कोरोना बाधित आढळली होती, तिच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे स्त्राव नमुने जिल्हा कोविड लॅबला पाठवण्यात आले होते. या व्यतिरिक्त दिनांक २३ जून रोजी पुण्यातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दहा जणांचे स्त्राव नमुने घेण्यात आले आहेत. मात्र, त्यांचे अहवाल येणे अजून बाकी आहे.
अश्या एकूण ३५ लोकांच्या घशाचे स्त्राव नमुने तपासणी पैकी आज २२ जणांचे नमुने प्राप्त झाले असून, ते कोरोना निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी माध्यमांना सांगितले आहे.
या सर्व व्यक्ती कोविड केअर सेंटर श्रीगोंदा येथे आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली आहेत. तालुक्यातील कोरोना चा धोका लक्षात घेता, सर्वांनी घरात राहत खबरदारीने आपली काळजी घेणे गरजेचे असल्याचे ही आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
(स्रोत:तालुका आरोग्य विभाग,श्रीगोंदा.)
