नागरी सुविधांसाठी (भाजपा शहराध्यक्ष) दीपक शिंदे यांचा आंदोलनाचा इशारा…

श्रीगोंदा दिनांक २८ मे:
    श्रीगोंदा प्रतिनिधी शहरात शाहूनगर मधील मंजूर रस्ता त्वरीत करावा आणि शिक्षक कॉलनी परिसरात सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नसल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी,दोन्ही कामे मार्गी लावावी.अन्यथा,श्रीगोंदा न.पा.ला कुठलीही पूर्व सूचना न देता,तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा (भाजपा शहराध्यक्ष) दीपक शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    शहरातील शाहूनगर मधील २५० मीटर रस्ता मंजूर असून,या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे.अन्यथा पावसाळा सुरू झाल्यावर काम करणे अवघड होईल. रस्त्याचे काम झाले नाहीतर, परिसरातील नागरिकांना रस्त्याचा वापर करणे जिकरीचे होईल.शिक्षक कालनी मध्ये ४०० ते ५०० कुटूंब राहतात. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून येथील नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नसल्याचे शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
  तरी पावसाळ्यापूर्वी या भागात गटार लाईनचे काम सुरु करावे.जेणेकरून या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.नाहीतर पावसाळ्यात साथीच्या आजाराने या परीसरा बरोबरच शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही .असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.नगरपालिकेने त्वरित हे प्रश्न न सोडविल्यास येथील पीडित नागरिकांना बरोबर घेऊन, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल ,अशा ईशारा(भाजपा शहराध्यक्ष) दिपक शिंदे यांनी पालिका प्रशासनास दिला आहे.

Leave a Reply