प्रा.विशाल गुलाबराव साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रदान !..
श्रीगोंदा(ढोकराई)दिनांक २८:
श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई येथील रहिवासी व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आकुर्डी ,पुणे येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक विशाल गुलाबराव साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी प्रदान केली आहे .
इंग्लिश साहित्य ” ए स्टडी ऑफ इंडियन इथॉस इन सिलेक्टेड नॉवेल्स ऑफ अमिताव घोष” या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता .इंग्लिश साहित्य विषयाचे इंटरनॅशनल कॉन्फरस मध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो .विदयार्थी,शिक्षक यांना शैक्षणीक अभ्यास क्रमात उपयोग व्हावा या दृष्टीने इंग्लिश साहित्य विषयामध्ये एम.फील पदवी प्राप्त केली आहे.
त्यांना पुणे येथील आय.ए.एस ई.औंध कॉलेज चे प्राचार्य.प्रा.डॉ.अशोकराव थोरात,राहुरी कॉलेज चे प्रा.डॉ.भाऊसाहेब जरांगे.यांचे मार्गदर्शन लाभले .प्रा.विशाल साळवे यांचे महाविद्यालयिन शिक्षण छत्रपती शिवाजी महाविद्यालय .श्रीगोंदा येथे झालेले असून श्रीगोंदा फॅक्टरी येथील बीएसनल चे सेवानिवृत्त अधिकारी गुलाबराव साळवे यांचे ते चिरंजीव व रेल्वे पोलीस अमोल साळवे यांचे बंधू आहेत .