श्रीगोंदा तालुक्यावर आलेले टंचाईचे सावट हे मानव निर्मित : बबनराव पाचपुते..

श्रीगोंदा दिनांक २८ मे:

श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुकडी च्या आवर्तनाची जबाबदारी घेऊन ज्यानी योग्य नियोजन करायला हवं होतं,त्यांनी ते केलं नाही.म्हणून आज दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत आहे. श्रीगोंदा तालुक्यावर आलेले टंचाई चे सावट हे निसर्गनिर्मित नसून,मानवनिर्मित असल्याचा दावा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
दुष्काळी परिस्थिती व कुकडी च्या पाण्यासंदर्भात बोलताना श्री.पाचपुते म्हणाले की, ” फेब्रुवारी मध्ये सव्वा नऊ टी.एम.सी. पाणी असतांना तातडीने बैठक घेऊन पाणी सोडावे,अशी मागणी तालुक्याची जबाबदारी घेऊन संबंधितांनी का केली नाही ? जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना चुकीचा अहवाल दिला.अण आवर्तन लांबणीवर पडले. ज्यावेळी कुकडी सल्लागार समितीची बैठक झाली. तीथे मी आजारी असल्याने त्या बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही. मात्र जे या बैठकीत हजर होते.त्यांनी पाण्याबाबत आक्रमक भूमिका घेऊन,शासनाला पाणी सोडण्यास भाग पडायला हवे होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. दरम्यान काळात वेळ वाया गेला. वेळीच पाणी सुटले असते तर, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टाळता आले असते. त्यामुळे उदभवलेली “टंचाई ची परिस्थिती ही निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे.”
शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण अधिक नुकसान होऊ नये. म्हणून, मी आजारी असताना देखील तातडीने पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्याचा पाठपुरावा केला. मात्र वरच्या भागात आंदोलन सुरू झाले, मुख्यमंत्र्यांना या बाबत कल्पना देऊन पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली. पोलीस बंदोबस्तात माणिकडोह मधून येडगावमध्ये पाणी आले. तत्पूर्वी वरच्या भागात कालवे सूरू असल्याने,पाणी पातळी खालावली. दरम्यान च्या काळात काही दिवसांचा अवधी गेला. मात्र मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचे कडे सतत केलेल्या आमच्या पाठपुराव्यास यश आले. या सर्व घडामोडीत ज्यांचा सहभाग तालुक्याला अपेक्षित होता?त्यांनी तो घेतला तर नाहीच उलट पाणी येणारच नाही. आलं तर मिळणारच नसल्याची आरोळी ठोकून! जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली.
तालुक्याची जबाबदारी स्वीकारून संबंधितानी आक्रमक पवित्रा घेतला असता तर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टाळता आले असते. दुर्दैवाने ते घडले नसल्याची खंत पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.

त्या बैठकीत हजर राहून त्यांनी काय केलं ? : गणपतराव काकडे

कुकडी कालवा सल्लागार समितीच्या एका बैठकीस बबनराव पाचपुते यांना आजारी असल्याने जाता आले नाही. या बैठकीत तालुक्याच्या वतीने उपस्थित असणारे चकार शब्द बोलले नाहीत. पाचपुते यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने शेवटी आवर्तन सुटले. अडचणीत आलेल्या कुकडी व विसापूर खालील लाभक्षेत्राला पाचपुते यांच्यामुळेच मोठा दिलासा मिळाला. –
गणपतराव काकडे (माजी उपसभापती पंचायत समिती, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading