अरुंद रस्ता व अतिक्रमनांमुळे आण्णा भाऊ साठे चौकात अपघात…

श्रीगोंदा दिनांक २९ मे:
श्रीगोंदा शहरालगत असलेल्या आण्णा भाऊ साठे चौका समोर आज सकाळी ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर अरुंद रस्ता व वाहनांवरील चालकाचा ताबा सुटल्याने, लाईटच्या पोलला जाऊन धडकला.ही घटना आज पहाटे ५ वाजनेच्या सुमारास घडली आहे.यात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे. काही कारणांमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे समोर येत आहे.
श्रीगोंदा येथील आण्णा भाऊ साठे चौक अनेक वर्षांपासून अतिक्रमनाच्या विळख्यात सापडला आहे.ससानेनगर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी अनेक वेळा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.मात्र,अतिक्रमण धारक पैकी काहींचा पूर्व इतिहास गुन्हेगार वृत्तीचा आहे.शिवाय ते प्रशासनास एट्रोसिटी ऍक्टचा धाक दाखवत असल्याने,त्यांच्यावर कोणी जास्त भाष्य करतांना दिसत नाही.शिवाय स्थानिक पोलीस व नगरपालिका प्रशासन यांकडे दुर्लक्ष करीत आहे.या अतिक्रमन स्थळी चालू असलेल्या अवैद्य धंद्यामुळे,त्या प्रक्रियेतील अनेक लोक याठिकाणी गर्दी करताना दिसतात.येथे साधारण पणे हॉटेल व्यवसाय,जुगार,गांजा विक्री,मावा विक्री,दारू विक्री सह एक पत्र्याच्या टपरीत बीफ ची अनधिकृत विक्री होत असल्याची चर्चा आहे.तरीही पोलीस यंत्रणा यावर कारवाई का करीत नाही?हे समजू शकले नाही.
वरील नमूद व्यवसायांमुळे येथे गर्दीचे प्रमाण वाढले असून, शेजारील अरुंद रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.आण्णा भाऊ साठे चौकात,गुंड प्रवृत्ती अवैध व्यवसाया मुळे पोसत आहेत.
ससानेनगर मधील पुरोगामी कार्यकर्ते या चौकाचे सुशोभीकरन करणार असून,फुलांची बाग, शाळेतील मुलांना आवश्यक ते साहित्य व वृत्तपत्रे याठिकाणी वाचनासाठी ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.तशी त्यांनी पालिकेकडे मागणी ही केली आहे. स्थानिक व आण्णा भाऊ साठे यांच्या विषयी आदर असनारे लोक वारंवार याठिकाचे अतिक्रमण काढण्याची मागणी करीत आहेत.
