जिल्हा प्रहार संघटनेची श्रीगोंदा,जामखेड,कर्जत तालुक्यांत दौरा व बैठकी चालू…
श्रीगोंदा दिनांक ५ जून:
अपंग व्यक्तींच्या समस्या जाणून घेणे, त्यांना विविध योजनांची माहिती देऊन,अहमदनगर जिल्ह्यातील अपंग व्यक्तींची आद्यावत नोंदणीचे कार्य प्रहार संघटना व प्रहार अपंग क्रांती आंदोलन च्या माध्यमातून हाती घेतले आहे. श्रीगोंदा,कर्जत,जामखेड विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात वाडी वस्तीत जाऊन विविध योजनांचे मार्गदर्शन मेळावे व बैठका घेतल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि ४ जुन रोजी श्रीगोंदा येथे प्रहार च्या संपर्क कार्यालयात झाली.त्यावेळी अपंग,विधवा,वयस्कर,महिला,पुरुष यांची संख्या भरपूर असल्याने,संजय गांधी निराधार योजने पासुन वंचित आसल्या चे दिसुन आले.
यापैकी दीव्यांग अपंगाची संख्या ज्यास्त आढळून आली . पैकी बऱ्याच अपंगाना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटत नाही.असे आढळून आले.शासनाने आपंगासाठी बरेच शाशन निर्णय पारीत केलेले आहेत.पण आपंगासाठी कोणकोणत्या योजना आहेत?याची माहिती वेळेवर न मिळाल्याने,शासनाच्या योजना पासुन बहुतांश अपंग वंचित आहेत.यापुढे एकही अपंग व विधवा महिला वंचित राहणार नाही.यासाठी गावा गावात जाऊन तेथील अपंगांची नोंद घेऊन त्या वंचित अपंगाना व विधवांना लाभ मिळत नाही. तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीसी खंबीर पणे ऊभे राहून त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत.असे यावेळी विविध योजनेची माहिती देताना प्रहार चे(महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष)संतोष पवार,(जिल्हाध्यक्ष) विनोद परदेशी,(महिला जिल्हाध्यक्ष)विमल अनारसे,प्रकाश बेरड यांनी दिली. यावेळी बैठकीसाठी (प्रहाचे मा.शहरध्यक्ष) नितिन रोही,भाऊ पुराणे,अजित गायकवाड वामन भदे(तालुकाध्यक्ष)नितिन शेंडगे,(अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष)राजेंद्र पोकले,सुरेश गलांडे,संतोष गायकवाड, भैलूमे साहेब,गणेश ससाणे,राजेंद्र भुजबळच्या सह शेतकरी आणि अपंग बंधु भगिनींसह विधवा व निराधार माहिलांची संख्या मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.