महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदाचे SSC परिक्षेत उल्लेखनीय यश..

श्रीगोंदा, दिनांक ११ जून:
मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या SSC परीक्षेमध्ये महादजी शिंदे विद्यालयाचा निकाल ८२.००% लागला असून Distinction ( विशेष श्रेणी ) मध्ये ८० विद्यार्थी व प्रथम श्रेणीत ९० गुण मिळवले.
विद्यालयातील प्रथम तीन:-
१. गाडेकर शिवेंद्रराजे बबन ९४.८०%,२. वाघ विजय विक्रम ९३.४०%,३.छत्तीसे संकेत सुरेश ९२.४०% गणित विषयात विद्यालयातील २ विद्यार्थी १०० पैकी १०० गुण मिळवले. ९० %पेक्षा अधिक गुण १२ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर,रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य ,LMC सदस्य, शाळेतील प्रशासकीय अधिकारी, गुरुकुल विभाग प्रमुख, तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष,माजी विद्यार्थी संघटना तसेच सर्व शिक्षकवृंद व सेवकवृंद, पालकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply