दुष्काळाची दाहकता लक्षात घेत सामाजिक भावनेतून जोशी वस्तीस पाणी पुरवठा…

जोशी वस्ती,श्रीगोंदा,दिनांक २३ जून:
यंदा लाबंनीवर गेलेला पाऊस,मैलोनमैल पाण्यासाठी होणारी पायपीट आणि दुष्काळाची दाहकता ध्यानात घेत,अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून दुष्काळात सामान्यांना वाचण्यासाठी पाणी पुरवठा केला आहे.या अनुषंगानेच श्रीगोंदा तालुक्यातील(श्रीगोंदा कारखाना) शेजारील,जोशी वस्ती येथील दादा शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत,जोशी वस्तीस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय केला आहे. येथील सामाजिक उपक्रमात हिरीरीने भाग घेणारे संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवल्याने,पाणी उपलब्ध करणाऱ्या शिंदे व सावंत यांचे जोशी वस्तीतील नागरिक आभार मानत आहेत.
संयोजक (बहुजन मुक्ती पार्टी अहमदनगर दक्षिण)दादा शामराव शिंदे,दत्ता शिंदे,सुदाम शिंदे हे गेल्या एक वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमध्ये लिंपणगाव परिसरातील जोशी वस्ती येथील ग्रामस्थांना कोणताही मोबदला न घेता,संपूर्ण वस्तीला मुबलक पाणी उपलब्ध करून देत आहेत. दादा शामराव शिंदे यांनी आपल्या बोरवेलचे पाणी संपूर्ण दुष्काळी परिस्थितीमध्ये संपूर्ण वस्तीला पुरवण्याचे काम केले, हा उपक्रम खरोखर समाजामध्ये आदर्श घेण्यासारखा आहे.आज पाच हजार लोक दररोज हे पाणी वापरत आहेत. शिंदे कुटुंब सातत्याने या वस्तीला पाणी पुरवत असल्याने,शिंदेंचे समाजातून कौतुक केले जात आहे.
