म्हसे गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या,मेंढ्याचा मृत्यू….

म्हसे,श्रीगोंदा दिनांक २४ जून:
श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथील नंदू विठोबा गोरे यांच्या ६ शेळ्या,२ मेंढ्या व १ बोकड बिबट्याचा हल्ल्यात ठार झाले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात अश्या घटना घडल्याचे नवीन नाही. मागील काही दिवसापूर्वी बेलवंडी स्टेशन या गावातील संदीप अरकत या शेतकऱ्याची शेळी २२ फेब्रुवारीच्या रात्री बिबट्याच्या हल्यात ठार झाली होती. त्या हल्ल्याच्या वेळी बिबट्या सोबत एक शावक असल्याचे प्रत्यक्ष्य दर्शी अरकत यांनी नमूद केले होते. सण २०१८ च्या दिवाळी सणाच्या दिवशी राशीन वरून फटाके घेऊन जाणाऱ्या हिरडगाव येथील दरेकर या शेतकऱ्याने लोहकऱ्यात तीन वाघाचे बछडे पाहिल्याचे सांगितले होते.मात्र नंतर ते तरस असल्याचे वनविभाच्या मार्फत जाहीर करण्यात आले. पाण्याच्या व शिकारीच्या शोधात वन्यजीव लोकवस्तीत येत असल्याचे वारंवार ऐकण्यात येत आहे. हरीण,काळवीट,तरस,लांडगा,माकड,वानर,रान मांजर सह इतर वन्यजीव अगदी लोकवस्तीच्या नजीक वावरतांना निदर्शनास येत आहेत. त्याबरोबरच श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याचे सर्रास होणारे हल्ले मात्र आत्ता सामन्याच्या पचनी पडू लागले आहेत.
