ऐतिहासिक संत गोविंद महाराजांची समाधी दुर्लक्षित,विकासासाठी जनआंदोलनाची गरज…

श्रीगोंदा दिनांक २७ जून :
श्रीगोंदा शहराच्या इतिहासाचा आढावा घेतला तर,अनेक महान संतांची ज्यात शेख महमंद बाबा पासून गोविंद महाराज,प्रल्हाद महाराज,गोधड महाराज,राऊळ महाराज,संत संतू महाराज,मंहमद महाराज तांबोळी,यांची नावे प्रकर्षाने पुढे येतात.साधारण १६०० साली आजच्या श्रीगोंद्याचे नाव चांभारगोंदा असल्याचे,आपल्या सर्वांच्या ऐकिवात आहे.मात्र,ते ज्या संतांच्या नावाने प्रचलित झाले आहे.त्या संतांची समाधी मात्र,दुर्लक्षित असल्याचे निदर्शनास येत आहे.
श्रीगोंदा हे चांभारगोंदा होते हे सांगीव गोष्टीवरून नमूद करणे थोडे गैर ठरेल.यासाठी,श्रीगोंदा हे साधारण १६०० साली चांभारगोंदा होता याचे काही पुरावे खालील प्रमाणे आहेत.
श्रीगोंद्याचा उल्लेख इतिहासाच्या पानावर चांभारगोंदा होता हे गावातील जुने राजवाडे,मंदिरे,बारवा,किल्ले,सनदा,नाणी , कागदपत्रे या संदर्भांवरून होत आहे.गोविंद महाराज हे श्रीगोंद्यातील महान संत चर्मकार समाजाची लोकवस्ती गावाच्या मध्यावर होती,आजही आहे. या गोष्टीवरून श्रीगोंद्यास चांभारगोंदा नाव मिळाले असावे असा इतिहास मानला जात आहे.
सन १६०० साली मालोजीराजे यांनी शेख महंमद बाबा यांना गुरु मानले.त्यांनी येथे मकरन्दपुरा हि पेठ वसवली.शेशाप्पा नाईक पुंडे यांच्याकडे त्यांचे आर्थिक संबंध होते.त्या इतिहासात चांभारगोंदा उल्लेख आहे,इंग्रजांनी सन १८०० साली केलेल्या सर्व्हे मध्ये,श्रीगोंद्याचे नाव पूर्वी चांभारगोंदा होते व ते गोविंद महाराजांच्या नावावरून पडल्याचे नमूद आहे,इंग्रजांनी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या नकाशात श्रीगोंद्याचा चांभारगोंदा म्हणून उल्लेख आहे.
यासह अनेक ऐतिहासीक घटना व दस्तावेजांमध्ये श्रीगोंदा चांभारगोंदा असल्याचे नमूद आहे.मात्र,इतिहासाच्या पानांवर हस्तक्षेप करणाऱ्यांमुळे श्रीगोंद्याचे नाव काळानुरूप बदलत गेले.ज्या संताच्या नावावर हे गाव इतिहासाच्या पानावर काही कालखंड नमूद राहिले व यानंतर हि उल्लेखिले जाईल. त्या महान संताची समाधी श्रीगोंदा वाशीय व स्थानिक प्रशासनापासून दुर्लक्षित असल्याचे समोर आले आहे.अनेकांनी यासाठी संघर्ष केला.मात्र,हा विषय ऐरणीवर येऊ शकला नाही.हि मोठी शोकांतिका आहे.दुर्लक्षित समाधीच्या विकासासाठी मोठे जनआंदोलनाची गरज असल्याचे समोर येत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading