महादजी शिंदे विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती ‘समता दिन’ म्हणून साजरी..

श्रीगोंदा दिनांक २६ जून:
याप्रसंगी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनचरित्राचा आढावा प्रा.जानराव सर यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराजांचे कार्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी होते.त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजनांची निर्मिती केली. त्या माध्यमातून अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले.प्रत्येक समाजासाठी वसतिगृहे,शिक्षण संस्था,स्वतंत्र क्षात्रपिठ व बहुजन समाजात पुजारी निर्मीतीसाठी प्रशिक्षण केंद्र,आंतरजातीय विवाह घडवून आणले.
शाहू महाराजांवर महात्मा जोतिराव फुले यांचा मोठा प्रभाव होता,ते सत्यशोधक समाजाचे खंदे समर्थक होते.असे महारांज्यांच्या जीवनातील अनेक पैलू त्यांनी स्पष्ट केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील तसेच संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या महत्त्वाच्या प्रसंगी छत्रपती शाहू महाराज भक्कमपणे पाठीशी उभा होते.बहुजन समाजावर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे अनंत उपकार आहेत.अशी भावना प्रा.जानराव सर यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना,गुरुकुल समन्वयक कोरडे बी.जी.सर यांनी विद्यार्थ्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे.त्यांच्या जीवनातील उदात्त मूल्यांसाठी,विचारांसाठी जो संघर्ष केला गेला.त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवनामध्ये संघर्ष करून,ध्येय गाठण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.असे उद्गार त्यांनी व्यक्त केले.यावेळी पवार संदेश व प्रतिक लकडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बी.के.राहिंज सर,श्री बोडखे,श्री दिलीप भुजबळ,दरेकर विलास,अरुणा तोरडमल,युगंधरा पाडळे तसेच इतर सेवकवृंद व विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभाग व इयत्ता दहावी ‘ई’ च्या विद्यार्थ्यांनी केले.तर,सुत्रसंचालन हर्षवर्धन वाजे याने केले.उपस्थितांचे आभार सचिन बोडखे याने मानले.

(विचारमंचावर उपस्थित मान्यवर तशेच मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थी..)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading