झारखंड मध्ये मुस्लिम युवकाला मॉब लिंचिंग करून हत्या केल्याच्या निषेधार्थ तहसिलदारांना निवेदन सादर..

श्रीगोंदा,दिनांक ०५ जुलै :

दि १७ जून २०१९ रोजी झारखंडमधील तरबेज अन्सारी या मुस्लिम युवकाला मॉब लिंचिंग करून हालहाल करून जीवे मारण्यात आले.या घटनेशी संबंधित सर्व आरोपींवर मॉब लिंचिंग विरोधी कायदा बनवून आरोपींना फाशी देण्यात यावी,मुख्य आरोपी पप्पू मंडल आणि त्याचे साथीदार यांना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जावा, तरबेज अन्सारी यांच्या कुटुंबातील सदस्यांना एक करोड रुपयांचा निधी देण्यात यावा,या मॉब लिंचिंग मध्ये सहभागी असणाऱ्या राजकीय पक्ष व संघटनांची मान्यता रद्द करावी, अल्पसंख्याक समाजास कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, दोषींना वाचवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे(जिल्हाध्यक्ष)संजय दगडू सावंत,सुरेश काशिनाथ रणणावरे,(युवा रक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज वामन घोडके, शिंदे समीर बाबासाहेब, अल्ताफ मुजावर, अलीभाई शेख,सुभाष बोराडे,ज्ञानेश्वर सावंत,अल्ताफ शेख,सुनील शिंदे,नबी सय्यद,अक्षय आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading