मिशन हायस्कूल मध्ये एक हजार वह्यांचे वाटप अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम..
श्रीगोंदा दिनांक ४ जुलै:
श्रीगोंदा येथील सर्व सुविधा पासून वंचित असलेल्या मिशन गर्ल्स हायस्कूल मधील भुमीहीन वंचित आदिवासी अनाथ विद्यार्थ्यांना सुमारे एक हजार वह्यांचे वाटप करण्याचा उपक्रम अग्नीपंख फौंडेशन राबविला.या वह्यांचे वाटप (गटविकास अधिकारी)प्रशांत काळे,बापूसाहेब गोरे,अनुपमा बगाडे यांचे हस्ते करण्यात आले.
गटविकास अधिकारी प्रशांत काळे म्हणाले कि भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन, अग्नीपंख फौंडेशन विद्यार्थ्यांना मदतीचा हात जेष्ठाचा सन्मान करण्यासाठी चांगले काम करीत आहे.मिशन गर्ल्स हायस्कूल मधील मुलांच्या हाती चांगल्या कंपनीच्या वह्या पाहून मला खुप आनंद वाटला.अग्नीपंखचे मधुकर काळाणे म्हणाले की,अग्नीपंख फौंडेशन पुढील तालुक्यातील आणखी काही विद्यालयातील गोरगरिब कुंटुबातील मुलांना शालेय साहित्य वाटप करणार आहे.
यावेेळी,(उपनगराध्यक्ष)अशोक खेंडके,संतोष क्षीरसागर गणेश लाढाणे,संग्राम घोडके,मधुकर काळाणे,शुभांगी लगड ,मनिषा काकडे आदि उपस्थित होते.प्रास्तविक तुषार शिंदे यांनी केले आभार वागस्कर यांनी मानले.