महादजी शिंदे विद्यालयात ‘फाली’ उपक्रमाअंतर्गत प्रमाणपत्रांचे वाटप…

श्रीगोंदा दिनांक ४ जुलै :
महादजी शिंदे विद्यालयात ‘फाली’ उपक्रमाअंतर्गत प्रमाणपत्रांचे वाटप…श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयांमध्ये रयत शिक्षण संस्था व जैन इरिगेशन लिमिटेड तसेच इतर चार कंपन्या यांच्या माध्यमातून ‘फाली’ हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमांतर्गत 40 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे व त्यांना मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सुनील टकले सर्व प्राध्यापक शिवाजी थिटे काम पाहत आहेत.
या उपक्रमाअंतर्गत ‘फाली’ याचा अर्थ(FUTURE leadership of INDIA) भारताचे कृषी क्षेत्रातील भविष्यातील नायक अशा अर्थाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. कृषी क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या संधी संशोधन याविषयी मार्गदर्शन केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांमधून भविष्यातील कृषी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती निर्माण व्हावेत हा यापाठीमागील हेतू आहे.सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्राविण्य मिळवले आहे.या उपक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचा वितरणाचा समारंभ विद्यालयात पार पडला.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य टी.पी.कन्हेरकर सर,विद्यालयाचे उपप्राचार्य जाधव सर,पर्यवेक्षक बुधवंत सर,ज्येष्ठ शिक्षक बोडखे सर,गुरुकुल प्रमुख लबडे सर,राहिंज सर,लवांडे मॅडम, निद्रे मॅडम,कदम सर,’फाली’ समन्वयक प्रा.सुनिल टकले,प्रा.शिवाजी थिटे उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानराव सर यांनी केले.तर,आभार प्रदर्शन कलाशिक्षक एस.पी.शिंदे सर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading