सिद्ध घाट येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण..

श्रीगोंदा दिनांक ४ जुलै:
सिध्दी घाट (दशक्रिया विधी )श्रीगोंदा या ठिकाणी उप पोलिस अधिक्षक संजय सातव साहेब यांच्या शुभहस्ते,पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब,पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या उपस्थितीत वटवृक्षाचे रोपन करण्यात आले.
धाकलं पंढरपूर म्हणुन ओळख असणार्या श्रीगोंदा शहरात दशक्रिया घाटाचे सुशोभीकरण झाले खरे.पण,ज्या गोष्टींची आवश्यकता पाहिजे,त्या गोष्टी येथे करायच्या राहिल्या आहेत.त्यात प्रामुख्याने झाडे लावणे महत्वाचे आहे. झाडे असतील तरच पशु पक्षी येथे वास्तव करतील.आज आपल्या शहरातील दशक्रिया विधी हे सिध्दटेक, लोणीव्यंकनाथ,बेलवंडी येथे जायाला लागले,का तर म्हणे येथे काकस्पर्श होत नाही,काक स्पर्श होण्यासाठी कावळे असायला पाहिजे,कावळे येथे राहण्यासाठी मोठाले वृक्षांची संख्या जास्त पाहिजे.नुसते झाडे लावुन जमणार नाही.तर, येथुन पुढे झाडे जोपासावा लागतील.तरच,या ठिकाणी काकस्पर्श होऊ शकतो.येथे पशु पक्षी यांचा चिवचिवाट ऐकायला मिळेल,सावली मिळेल.असे प्रतिपादन अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने गोरख आळेकर यांनी केले.”झाडे लावा.झाडे जगवा आणि झाडे जोपासा”या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.आज दशक्रिया विधी या ठिकाणाच्या सुशोभीकरणासाठी सुनिल वाळके मित्र मंडळ,शहाजी खेतमाळीस मित्र मंडळ,कानन पेट्रोलियम, साई ग्लास अॅन्ड अॅल्युमिनियम,इंदिरा गांधी नागरी सह. पतसंस्था,पोखर्णा ट्रेडस,संत शेख महंमद महाराज विविध कार्यकारी सेवा सोसायटी,फुले-शाहु-आंबेडकर विचारक, सत्यम ट्रेडर्स इत्यादींनी विशेष सहकार्य केले.
यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे,राजेंद्र म्हस्के,अॅड.रंगनाथ बिबे,अशोक खेंडके,राजु गोरे,शहाजी खेतमाळीस,अख्तर शेख,नगरसेविका मनिषा वाळके,नगरसेवक संतोष कोथिंबीरे,टिळक भोस,प्रशांत गोरे,सतिश मखरे,सतिशशेठ पोखर्णा,भाऊसाहेब खेतमाळीस,भिमराव आनंदकर सर,बापूराव सिदनकर,डॉ.चंद्रकांत कोथिंबीरे, नवनाथ दरेकर साहेब,बाळासाहेब कोंबडे,बाबु बोडखे, किसनराव बोरूडे,पो.काॅ.अविनाश ढेरे,संतोष इथापे, भगवानराव वाळके,भिमराव कोथिंबीरे,दादाम कोथिंबिरे, ह.भ.प.राम खेतमाळीस,पोपट कोथिंबीरे,राहुल वाळके, पांडुरंग खेडकर,राजेंद्र राऊत,संतोष पोटे,प्रतिभा गांधी, पुष्पा सुपेकर,सुप्रिया आळेकर,अरूणा मेहेर,सुवर्णा सुपेकर संध्या रसाळ इत्यादी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading