“एशियन चॅम्पियन कॅडेट कुस्ती” स्पर्धेत श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडला कांस्य पदक. 

श्रीगोंदा, दिनांक ७ जुलै:
५ जुलै रोजी कझाकीस्तान मध्ये पार पडलेल्या"एशियन चॅम्पियन कॅडेट कुस्ती" स्पर्धेमध्ये श्रीगोंद्याची पैलवान भाग्यश्री फंडने देशासाठी कांस्य पदक मिळवून दिले आहे.
भाग्यश्रीने पहिल्या कुस्ती मध्ये चीनची पैलवान झागी वाय.ला(10-00) ने पराजीत करीत,आपला विजय रथ चालू केला.मात्र दुसऱ्या कुस्तीला उजबीस्थानचा पैलवान सोबीरोवा कडून पराभवाचा सामना करावा लागला.यामुळे भाग्यश्रीची सुवर्ण पदकांची आशा मावळली. यानंतर कांस्य पदकाच्या लढतीमध्ये,भाग्यश्रीचा जपानची पैलवान इचूंदा हिच्या बरोबर सामना रंगला.जपानच्या पैलवानास (06-00) ने पराभूत करून भाग्यश्री देशासाठी कांस्य पदकाची मानकरी ठरली.या सुवर्ण कामगिरीमुळे भाग्यश्रीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.भाग्यश्रीची ही दुसरी इंटरनॅशनल स्पर्धा होती.दोन्ही स्पर्धेत तिने पदकांची कमाई केलेली आहे.अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत विजय संपादित करीत आणि मेहनतीच्या जोरावर तिने यश मिळवल्याने तिचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जाते आहे. भाग्यश्रीने या यशाचे सर्व श्रेय कोच (किरण मोरे),शिक्षक आणि वडीलधाऱ्या मंडळींना दिले आहे. 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading