श्रीगोंदयात जीवघेण्या माव्याची खुलेआम विक्री,अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष,अन्वर शेख वरील कारवाई कोणाच्या तक्रारीवर?..

श्रीगोंदा,दिनांक ७ जुलै
शहरात असे काही उद्योग आहेत,जे,सामन्यांच्या जीवावर बेतू शकतात.श्रीगोंदा बस स्थानकाच्या शेजारी चालू असलेल्या एका टपरी मध्ये अश्याच पध्दतीने माव्याची बेकायदा विक्री होत आहे.यांवर तो तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य नगर वरून आणले जात असल्याचे समजते आहे.ते कच्चे साहित्य श्रीगोंदा बस स्थानकातील एक कर्मचारी रोज नगर वरून आणत असल्याचे समजते आहे. या मावाच्या(खर्रा)चपेट मध्ये श्रीगोंद्यातील कमीत कमी वयोगटातील मुलांसह वयोवृद्धांचा समावेश वाढतो आहे.
श्रीगोंदा शहरात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई झाल्याचे ठराविकच किंवा तुरळ्कच उदाहरणे आहेत.श्यक्यतो कोणी तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यावरच,अश्या कारवाई झाल्याचे समोर येत आहे.कारण श्रीगोंद्यात सध्या चालू असलेल्या दुकानांत कोणत्या पद्धतीने खाद्य पदार्थांची विक्री केली जाते?याचे संशोधन करण्याची वेळ सामान्य माणसावरच येऊन ठेपली आहे.कारण आपला पाल्य शाळेत जातो म्हणून सांगून गेला. तो बाहेर गेल्यावर काय कारतो? काय खातो? याचा विचार करण्याची जिम्मेदारी आत्ता या निमित्ताने वाढली आहे.श्रीगोंदा शहराच्या प्रत्येक चौकात अश्या प्रकारचा मावा किंवा खर्रा विक्री करणाऱ्या टपऱ्या आहेत. शाळकरी मुले साधारण सातवी आठवीतील,हेही याचा शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहेत.मिळालेल्या माहिती नुसार श्रीगोंदा बस स्थानकाच्या दौंड कडील गेट जवळ मावा विक्री करणारी एक टपरी आहे.तेथे रोज १५ किलोच्या आसपास मावा विक्री होत आहे. छोटी पुडी १० व मोठी पुडी २० रुपयास विक्री केली जात आहे. या मावा विक्रीकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. माव्यामूळे अनेक गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवण्याची श्यक्यता आहे.ज्यात तोंडाचा कर्करोग(जिभेचा,गालाचा,ओठांचा,त्वचेचा कर्करोग),सह इतर तोंड व पोटाच्या संबंधित आजार जडण्याची श्यक्यता आहे. या संबंधी कोणतीही वैज्ञानिक चेतावणी देणारी जाहिरात,यावर नमूद करण्यात येत नाही. हा मावा साध्या पॉलिथिनच्या पिशव्यांत भरून विक्री केले जात आहे.
एवढा विषारी पदार्थाची मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी विक्री होत असून,खुलेआम चाललेल्या या मावा विक्रीवर प्रशासन कारवाई का करत नाही?असा प्रश्न श्रीगोंदेकरांच्या मनात उपस्थीत होऊ लागला आहे.शिवाय अडगडीत किंवा जास्त वर्दळीत नसलेल्या अन्वर शेखच्या दुकानावर प्रशासन कारवाई होते तर मंग श्रीगोंदा बस स्थानकासह प्रत्येक चौकात खुलेआम चालू असलेल्या अनधिकृत मावा व खर्राच्या विक्रीवर कारवाई का होत नाहि? कि अन्न आणि औषध प्रशासनाने जीवघेण्या खऱ्यास श्रीगोंद्यात परवानगी तर दिली नाही ना?असा प्रश्न सामान्य श्रीगोंदा वाशियांच्या मनात निर्माण झाला आहे.
Related