श्रीगोंदा शहरातील घनकचरा व्यवस्थापनेसाठी स्थानिकांचे पालिकेत आंदोलन…वंचित बहुजन आघाडी,संभाजी ब्रिगेडसह प्रहारच्या पदाधिकऱ्यांचा सक्रिय सहभाग..

श्रीगोंदा,दिनांक ८ जुलै:
श्रीगोंदा शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनेसाठी,नगरपालिका प्रशासनामार्फत भिगांनरोड नजीक डंपींग ग्राऊंडची व्यवस्था करण्यात आली आहे.रोज शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची याठिकाणी विल्हेवाट लावण्यात येते. साधारण दहा वर्ष्यांपासून यावर जाधव नावाचा इसम मुकादम म्हणून,नाशिकच्या एका कंपनीकडून कार्यरत आहे.या कंपनीला मिळालेला हा ठेका पुन्हा पुन्हा याच कंपनीस कसा आणि कोणत्या अधिकारात मिळत आहे? हे मात्र समजू शकलेले नाही.वारंवार एकाच कंपनीकडे नगरपालिका विश्वास दाखवत असल्याने,या जाधव नावाच्या ठेकेदाराचे चांगलेच फावले आहे.निर्ढावलेल्या या यंत्रणेचा आज भोळे वस्ती येथील नागरिकांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
वारंवार आंदोलन करून,मागण्या पूर्ण होत नसल्याने,स्थानिक पिडीतांनी प्रहार संघटनेसह वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यां मार्फत आक्रमक पद्धतीने हे आंदोलन सुरु केले.या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या झोपलेल्या यंत्रणेला जागे करण्यासाठी श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची खुडचीच दालना बाहेर काढली.थेट नगरपालिकेच्या बाहेर आणून ती पेटून देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांची भूमिका लक्षात येताच सभेच्या पदाधिकऱ्यांचे मात्र मांजर झाले. काही पदाधिकाऱ्यांनी तर वातावरण तापल्याचे पाहत तेथून पळ काढला.
अनेक वर्ष्यांपासून नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विविध मागण्यांसाठी न.पा.च्या दारात आंदोलन करण्यात आलेत. मात्र, आश्वासना शिवाय पालिका काहीच निर्णय घेऊ शकली नाही.पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह,सदश्यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होऊ लागल्याने. आज आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय स्थानिक पिडीतांनी घेतला.
घनकचरा व्यवस्थापन अंर्तगत डंपिंग ग्राउंड ठिकाणी घनकचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्याने.तशेच,संबंधित ठिकणी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे,आजपर्यँत येथे २० शेळ्या मोकाट श्वानांनी मारल्या आहेत,या परिसरात प्लास्टिकचे वर्गीकरण न झाल्याने प्लास्टिक स्थानिकांच्या शेतात पांगले आहे. ते काढण्यात यावे,सर्वदूर दुर्गंधी पसरलेली आहे,येथील वायू परीक्षण करण्यात आलेले नाही,येथील विहिरी,बोअरवेल,व जलाशयांचे पाणी तपासणी करण्यात यावी,ओला/सुका कचरा निवडण्यात यावा,गांढूळ,खत प्रकल्प राबविण्यात यावा,या ठिकाणी कीटक,माश्या,डास यांचे प्रमाण वाढलेले असून,त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात,कचरा डेपोवर वेळोवेळी मृत जनावरे,गाय,डुक्कर,घुशी आणून टाकण्यात येतात,या सर्व प्रकाराने स्थानिकांचे जनजीवन धोक्यात आहे.नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे,श्वसनाच्या गंभीर आजारानां सामोरे जाण्याची वेळ येथील स्थानिकांवर येऊन ठेपली असल्याने हे आंदोलन करण्याचा निर्णय स्थानिक पिडीतांनी घेतला.
आंदोलनांत प्रहार संघटनेचे(जिल्हा अध्यक्ष)विनोद परदेशी,(तालुका अध्यक्ष)वामन भदे,वंचित बहुजन आघाडीचे(तालुका अध्यक्ष)कांतीलाल कोकाटे,नितीन रोही,संभाजी ब्रिगेडचे(तालुकाध्यक्ष)अरविंद कापसे,(उपाध्यक्ष)सतीश बोरुडे,संतोष गायकवाड,(नगरसेवक)संतोष कोथंबीरे,शहाजी खेतमाळीस,मनोहर पोटे,मुख्याधिकारी विश्वम्भर दातीर सह स्थानिक पीडित लोक उपस्थित होते.यावेळी श्रीगोंदा पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी यांनी पाच दिवसांत सर्व मागण्यांची पूर्तता करू अशे लेखी आश्वासन दिले आहे.
या आंदोलनांच्या निमित्ताने,वारंवार एकाच ठेकेदाराला कोणत्या पद्धतीने ठेका मंजूर केला जातो?,त्याच्या कामाविषयी अनेक तक्रारी असतांना,तो ते काम पूर्ण करीत नाही,रोज जमा होणारा ओला आणि सुका कचरा याची विल्हेवाट लावण्यास तो अकार्यक्षम का आहे?,जैविक कचऱ्याची विल्हेवाट कोणत्या प्रकारे लावण्यात येते?,रोज जंतुनाशक पावडर चा वापर का केला जात नाही?,पेस्ट कंट्रोल चा वापर का केला जात नाही?,फॉगिंग का केले जात नाही?कचरा कुंड्यात जाळू नका.यामुळे,सामान्य लोकांना आजार जडतील. या सूचनेचे पालन हा ठेकेदार का करीत नाही?या बरोबरच अनेक मुद्दे आहेत.ज्याचे हा जाधव नावाचा ठेकेदार आणि त्याची ती नाशिकची कंपनी का करीत नाही ?यातून न.पा. मार्फत लाडवलेला ठेकेदार जाधव व निर्ढावलेली त्याची कंपनी आणि कर्मचारी सामन्यांना स्वहितासाठी मरणाच्या दाढेत उभा करणार हे मात्र निश्चित झाले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading