हिरडगाव फाट्याजवळ गाडी लुटनारे आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात,आरोपींकडून गुन्ह्यांची कबुली..


श्रीगोंदा दिनांक १० जुलै :
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील साईकृपा कारखाना शेजारील परिसरात,हिरडगाव ते चांडगाव कडे जाणाऱ्या रोडवर(आकुर्डी),पुणे येथील इसम सुनील शंकर नारखेडे यांना,त्यांची गाडी टाटा झेस्टा ने कट मारल्याचा बहाणा करून दोन इसमांनी गाडी अडवीत,चाकूचा धाक दाखवून,नारखेडेंच्या गाडीचा ताबा घेत,गाडीसह लॅपटॉप,मोबाईल,घड्याळ,रोख रक्कम अशी एकूण ७,५३,०००/- रुपयांचा माल चोरून नेला होता.सुनील नारखेडे या पीडिताच्या फिर्यादीनुसार दिनांक ७ एप्रिल १९ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३९२ व ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.दरम्यान,श्रीगोंदा पोलीस प्रशासनामार्फत संशयीत आरोपींचे फोटो दाखवण्यात आले.मात्र,फिर्यादीला ओळख पटत नव्हती.अश्या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या संदर्भात आसपासच्या जिल्ह्यात चौकशी चालू होती. त्यानुसार या गुन्ह्याची उकल होईल,अशी माहिती श्रीगोंदयाचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली.
(पोलीस अधीक्षक)इशू शिंधु साहेब,(अप्पर पोलीस अधीक्षक)सागर पाटील साहेब(,उपविभागीय पोलीस अधिकारी)संजय सातव साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार,तालुक्यातील लिंपणगाव येथील दोन तरुण पुण्यात कामाला असून,त्यांच्याकडील चारचाकी गाड्या ते वारंवार नंबर बदलून वापरत असल्याचे निदर्शनास आल्याचे समजले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अदेशानुसार(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव साहेब यांनी याकामी तपास पथक नेमले.शोध पथकाचे(पोलीस उपनिरीक्षक)सोमनाथ कर्णवर,(पोहेकॉ)अंकुश ढवळे,(पोकॉ),दादासाहेब टाके,किरन बोराडे,उत्तम राऊत,आदित्य बेलेकर,यांनी संशयीत अजिनाथ नवनाथ कुरुमकर,वय वर्षे २० रा.मुंढेकरवाडी,ता.श्रीगोंदा.यास(तळेगाव दाभाडे),पुणे येथून ताब्यात घेतले.त्याच्याकडे याप्रकारणी चौकशी केली असता,त्याने गुंह्याची कबुली दिली.शिवाय त्याचा मित्र महेश दिलीप कुरुमकर रा.मुंढेकरवाडी,ता.श्रीगोंदा याचे साथीने हा गुन्हा केल्याचे अजिनाथने पोलिसांना सांगितले.,मुंढेकरवाडी येथून महेश कुरुमकर यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडील मुद्देमाल फिर्यादीचा लॅपटॉप,मोबाईल,एटीम,आधारकार्ड,व पाकीट आणि पैसे अंगझडतीतून मिळून आल्याचे श्रीगोंदयाचे(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. ७०००००/- रुपये किमतीची टाटा झेस्टा कार(एम.एच.१२ एन ई ३४४४),४५०००/-रुपये किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप,७०००/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन,२०००/-रुपये रोख रक्कम,व आधारकार्ड,पॅनकार्ड,ड्रायविंग लायसन,असा एकूण ७,५३,०००/- किमतीचा व वर्णनाचा गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सो,उप्पर पोलीस अधीक्षक सो,उपविभागीय पोलीस अधिकारी सो व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक सो,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरक्षक कर्णवर सो व त्यांचे नमूद पथक यांनी हि कारवाई केली असून,गुन्हा उघडकीस आणण्याकामी,मोबाईल सेलचे पोकॉ प्रशांत राठोड,नितीन शिंदे,मपोना ज्योती काळे,मपोकॉ रिंक्की माढेकर,यांनी मदत केली आहे.पो.नि. जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार सपोनि विठ्ठल पाटील व पोकॉ नय्युम पठाण पुढील तपास करीत असल्याचे समजले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading