साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कर्जत मध्ये ब.स.पा.कडून कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन..

दिनांक १९ ऑगस्ट,(कर्जत) श्रीगोंदा :
बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिल्ह्यातर्फे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पक्ष्याच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंतीचे औचित्य साधत,कर्जत येथे कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.याविषयीचे प्रसिद्धी पत्र(जिल्हा प्रभारी)सुनिल ओहोळ यांनी माध्यमांना प्रसिद्धीस दिले आहे.या कार्यकर्ता संमेलनास मा.राम अचल राजभर(राज्य प्रभारी),मा.खा.अशोकजी सिद्धार्थ(राष्ट्रीय महासचीव),मा.सुरेशजी साखरे(प्रदेश अध्यक्ष),मा.दयानंद किरतकर(प्रदेश कोषाध्यक्) आदि मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून,जिल्ह्यातील बहुतांश कार्यकर्त्यांनी या संमेलनास उपस्थित राहण्याचे ओहोळ यांनी आवाहन केले आहे.दिनांक २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२:०० वाजता लकी हॉल,कर्जत यथे या कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे कि,महाराष्ट्र हे अनेक महापुराषांचे जन्मस्थान असून,बहुजन समाज पार्टी हि एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे.जी,महापुरुषांच्या विचाराने काम करत आहे. उत्तर प्रदेशात चार वेळा पार्टीची सत्ता आली.त्या प्रत्येक वेळेला बहुजन समाजातील जनतेसाठी बहन कुमारी मायावती यांनी मोठे कार्य केले आहे.त्यांच्या कार्यकाळात अनेक महापुरुषांचे स्मारके उभारण्यास त्यांनी प्राधान्य दिलेले आहे.तशेच अनेक जिल्ह्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत.त्याचबरोबर,अनेक विद्यापीठ,महविद्यालये व शाळांची निर्मिती करून,बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली आहे.भूमिहीनांना लाखो हेक्टर क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. आजही,ब.स.पा.चे लोकसभेत १० तर,राज्यसभेत ५ खासदार कार्यरत आहेत.ते नेहमीच अन्याय अत्याचारच्या विरोधात संघर्ष करीत असून,बहुजन समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी कार्य करणारी एकमेव पार्टी म्हणून बहुजन समाज पार्टीचा गवगवा आहे.
कर्जत येथील कार्यकर्ता संमेलनासाठी नमूद मान्यवरांसोबत मा.किरणजी अल्हाट(प्रदेश महासचीव),मा.बाप्पू कुदळे(अहमदनगर प्रभारी),बाळासाहेब अवारी व प्रशांत कसबे हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी बहुतांश कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रसिद्धी पत्राद्वारे करण्यात आले आहे.

Leave a Reply