स्वातंत्र दिनानिमित्त पिसोरे(खांड) येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम सम्पन्न..
दिनांक १५ ऑगस्ट,पिसोरे(खांड) श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे(खांड)येथे स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत,वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्रीगोंदा (पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव व(पोलीस उपविभागीय अधिकारी,कर्जत)चे संजय सताव यांच्या हस्ते वृक्षारोपण करीत संप्पन्न झाला.यावेळी,विविध स्थरांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.सुनिल ओहोळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर,संतोष इथापे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी,संतोष इथापे व सुनिल ओहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.समाजाने चांगल्या विचारांच्या प्रवाहात येत,कायद्याचा आदर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे उपस्थितांना अवाहन केले..व्यसनाधीनते मुळे वाईट मार्गाला जाऊन,अनेकांचे आयुष्य बरबाद झाल्याचे यावेळी इथापे यांनी नमूद केले आहे.दारूच्या आहारी जात अगदी कमी वयात अनेक युवकांची जीवनयात्रा संपल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सुनिल ओहोळ यांनीही समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचा आढावा घेत,सनदशीर मार्गाने आपले जीवन आक्रमण करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.वाईट प्रवृतींच्या संगतीने जीवनाचे वाटोळे होत असून,महामानवांच्या व संतांच्या शिकवणी नुसार,आपली वाटचाल असावी.म्हणून,संतांच्या वचनांचा आधार घेत गावोगावी वृक्षवल्ली वाढवीत ते जोपासण्याची जोम्मेदारी स्वीकारणार असल्याचे सुनिल ओहोळ यांनी या वृक्षारोपन कार्यक्रमात बोलताना नमूद केले.
(पोलीस उपविभागीय अधिकारी) व (पोलीस निरीक्षक श्रीगोंदा)यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी यावेळी,आपले विचार मांडले.हजारो वर्ष्यांपासून, निसर्गतः उपलब्ध संपत्तीचा मानवाने आपल्या गरजांसाठी नायनाट केला.वृक्ष तोडीने मानवासह सर्व सजीवांवर मोठे संकट ओढावले.परिणामी पाऊसाचे प्रमाण घटले आहे.जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.काही दशकापुर्वी विहिरींतून हाताने पाणी घेता येत होते.पुढील काही कालखंडात हि परस्थिती बिकट होन्यापुर्वी वृक्षारोपण करून,त्यांचे मुलांप्रमाणे संगोपन करणे हि काळाची गरज झाले असल्याचे मत पि.आय.दौलतराव जाधव यांनी यावेळी मांडले.
याप्रसंगी,बोलतांना(पोलीस उप विभागीय अधिकारी)संजय सातव यांनी पिसोरे(खांड)येथील ग्रामस्थांनी चालवलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले.शिवाय स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देत.यापूर्वी कार्यरत असलेल्या हडपसर(पुणे) याठिकानी काही सामाजिक संस्था व महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून,असे वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात आल्याचे,त्यांनी सांगितले.तेथे सुमारे चार हजार झाडे लावले असून,ते विद्यार्थी त्या झाडांचे व्यवस्थित संगोपन करीत असल्याचे फोटो आजही साडे तीन वर्ष्यांपासून मला सामाजिक माध्यमांद्वारे पाठवीत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.सामाजिक भावनेतून हा उपक्रम त्याठिकाणी चालू होता.पाण्याच्या मोकळ्या बाटल्या जमा करून त्याआधारे,उन्हाळ्यात या झाडांना जगवण्याच काम त्यांनी त्यावेळी केले.अश्याच प्रकारे याही झाडांना जगविण्यासाठी पाण्याची सोय करा.अशी सूचना सातव साहेबांनी उपस्थित ग्रामस्थांना केली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी टकले सरांनी उपस्थितांचे आभार मानले.सातव साहेब,जाधव साहेब यांच्या हस्ते याठिकाणी वृक्ष लावीत रुक्षारोपनाची सुरुवात केली.यावेळी,सुनिल ओहोळ(बसपा प्रभारी,अहमदनगर),महेंद्र इंगळे,संतोष इथापे,सुलेमान भाई शेख,प्रसाद इंगळे,दादासाहेब गावडे,संजय इंगळे,बी.आर.गावडे,योगेश खेंडके,मुनेर शेख,बाबासाहेब ओहोळ,शिवाजी श्रीराम,विलास येरकळ,वामन येरकळ,पठाण इंगळे,सुनिल गोरे,मिठू देवकाते सह पिसोरे खांड गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.