महापरीक्षा पोर्टलवर स्पर्धा परीक्षार्थींचा आक्षेप.श्रीगोंदा तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा..

विद्यार्थ्यांचे मोर्चाला संबोधित करताना प्राध्यापक शिवव्याख्याते कानिफनाथ उगले उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी प्रशासकीय अधिकारी व उपस्थित नागरिक
(छाया:मच्छिंद्र सुद्रिक)
दिनांक १४ ऑगस्ट श्रीगोंदा:
राज्य शासनाने विविध विभागांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी पदभरती सुरु केली आहे.यासाठी ई-महापरीक्षा नावाचे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.या पोर्टलच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आज श्रीगोंदा शहरातुन मोर्चा काढत आक्षेप नोंदविला आहे.या परीक्षा पध्दतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे.लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरु असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी या आंदोलनात केला आहे.
……………………………………………………………………………………………………………………………………
राज्य सरकारने तलाठी,ग्रामसेवक,पोलिस भरती,अभियांत्रिकी,आरोग्य विभाग,महावितरण कर्मचाऱ्यांची भरती ई-महापोर्टलच्या माध्यमातुन करण्याची घोषणा केली आहे.२ ते २८ जुलै दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेत,पारदर्शकतेचा व विश्वासर्हयता अभाव दिसुन आला. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याचे संशय स्पर्धापरिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांनी व्यक्त केला आहे.मोर्चाचे नेतृत्व अमोल मांडे, शिवाजी फंड, राहुल म्हेत्रे, रुपाली खेडकर, अविनाश आघाव, प्रशांत पवार, उमेश दिवटे, गणेश खामकर,गणेश जगताप, विकास शिवले, तुकाराम हिरवे यांनी केले.यावेळी,नायब तहसीलदार डाॅ.योगिता ढोले यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन स्विकारले.
याप्रसंगी, प्रा.योगेश मांडे,प्रा.कानिफनाथ उगले,राहुल साळवे,प्रा.संतोष धुमाळ,पांडुरंग शेलार यांनी मनोगत व्यक्त करीत,विद्यार्थ्यांची व्यथा मांडली.यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading