साध्या पद्धतीने ईद साजरी करीत,काष्टीतील मुस्लीम बांधवांची पिडीत पूरग्रस्तांना आर्थिक मदत..
दिनांक १२ ऑगस्ट,श्रीगोंदा:
सांगली,कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावल्या असून,जात पात,धर्म,वंश अश्या मानसिक बंधनांना बाजूला सारीत,माणूसकि जपण्याचा अनेकांनी यानिमित्ताने निर्णय केला आहे.पंचगंगा नदीच्या पुरात सर्व बंधन वाहत जात.माणुसकी आणि माणूसपण जपण्याचा संदेश निसर्गाने मानव समाजाला घालून दिल्यासारखा जगामोर येत आहे.श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांबरोबर,काष्टी येथील मुस्लीम बांधवांनी आजच्या ईद सनाला साध्या पद्धतीने साजरा करीत,पिडीत पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत देण्याचे ठरवले.त्यानुसार एकत्र येत पंधरा हजार रपये जमा करून,सकाळ माध्यमाच्या रिलीफ फंड मध्ये हि रक्कम आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी जमा करण्यात आली.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील मुस्लीम समाज बांधवांनी सांगली,शिरोळ,कोल्हापूर येथील महा भयानक पूर स्थितीत सापडलेल्या,नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात या उद्देशाने,वर्ष्याच्या ईद सणाला साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून,त्यातून वाचणाऱ्या रकमेतून १५ हजार रुपयांचा निधी जमा करून,सदरील निधी सकाळ माध्यमाचे प्रतिनिधी संजय काटे यांच्याकेडे सुपूर्त करण्यात आला आहे. श्रीगोंदा(पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव यांच्या हस्ते हा निधी(सकाळचे पत्रकार) संजय काटे यांना देण्यात आला. अश्या आपातकालीन परस्थितीत,माणसांचे होणारे हाल पाहताना, अनेकांचे काळीज हेलावत,भावनांना पाझर फुटला.काळीज पिळवटून टाकणारे प्रसंग पाहून,अनेकांनी मदत केली.काहींनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देऊ केली.तर,काहींनी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून तशेच व्ययक्तिकरित्या या पिडीतांना मदत देण्यात आली आहे.हि मदत देते वेळी,पत्रकार मच्छीन्द्र सुद्रीक,योगेश खेंडके, नितीन रोही,राजू शेख,प्रमोद काळे सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी काष्टीतील हाजी मेहबूब भाई शेख,राजूभाई सय्यद,रफिक इनामदार,याकूनभाई सय्यद,गुलाबभाई तांबोळी,अन्सार भाई पठाण(वस्ताद),शक्कुरभाई जकाते,राजूभाई तांबोळी,फिरोज शेख,इरफान भाई बागवान,शकील भाई शेख(पत्रकार),अमीन भाई शेख(संपादक,दैनिक सिटीझन),हाजी गणीभाई जकाते,इत्यादींनी एकत्रित येत,काष्टीतील मुस्लीम बांधवांच्या वतीने,पिडीत पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिली आहे. अन्सार भाई पठाण (वस्ताद) यांनी शंभर ड्रेस यावेळी पूरग्रस्तांना मदत दिले आहेत. या सामजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.