गोरख आळेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सर्व रोग निदान शिबिर सम्पन्न.
दिनांक १२ ऑगस्ट,श्रीगोंदा:
पिरॅमिड हॉस्पीटल दौंड व अस्तित्व फाऊंडेशन श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते व सरस्वती नदी सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष गोरख आळेकर यांच्या वाढदिवसा निमित्त, दिनांक ११ ऑगस्ट रोजी प.पू.मोरे दादा हाॅस्पिटल,श्रीगोंदा येथे सर्व रोग निदान शिबीर संपन्न झाले.यावेळी,अनेक गरजू रुग्णांसह मान्यवरांच्याही तपासण्या करण्यात आल्या.तसेच केक न कापता रोपांचे वाटप करण्यात आले.
प.पू.मोरेदादा हाॅस्पिटल मध्ये या शिबिरातील सुविधांचा लाभ गरजू रुग्णांना कायम स्वरुपी मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.यावेळी (पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव यांनी गोरख आळेकर यांच्या कार्याचा गुणगौरव केला.याचबरोबर ज्योती आनंदकर,(नगराध्यक्षा) शुभांगी पोटे यांचे या कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा पर भाषणे झाली.सतिश पोखर्णा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर,शहाजी खेतमाळीस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष(श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक)दौलतराव जाधव,प्रमुख उपस्थितीत(श्रीगोंदा नगरीच्या नगराध्यक्षा)शुभांगी पोटे,(सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता) ज्योती आनंदकर,एम. डी.मेडिसीन डॉ.महेंद्र पाटील(शल्यचिकीत्सक)डॉ.लक्ष्मीकांत सप्तर्षी,डॉ.संतोष हिरडे, डाॅ.स्मिता तरटे,डॉ.अभिजीत तिवाटणे, डाॅ.चव्हाण,राजुदादा गोरे,बापुशेठ गोरे,देवराव वाकडे,शहाजी खेतमाळीस,सतिश मखरे,संतोष क्षीरसागर,संतोष कोथिंबिरे,भाऊसाहेब खेतमाळीस,बापूराव सिदनकर,अख्तर शेख,प्रशांत गोरे,भरत नाहटा,अॅड.लोखंडे, बंडु डाके,डॉ.दत्तात्रय बनसुडे,माधव बनसुडे,सुप्रिया आळेकर,संध्या रसाळ,अरूणा मेहेर,सुवर्णा सुपेकर,गणेश कोथिंबिरे,संदिप उमाप,नितीन अस्वर,विलास होले, वडवकर,रामदास राऊत,सत्यवान गोंधळी,जिजाबापु जगताप इत्यादी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.