पूरग्रस्त भागत भुकेने व्याकुळ झालेल्या मुलांना बिस्किटे वाटप.अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम..

दिनांक १० ऑगस्ट,श्रीगोंदा :
कराड मध्ये पुरगस्त परिस्थितीचा तडाखा बसलेल्या लहान मुलांना,अग्नीपंख फौंडेशनने पाठवले बिस्किटे वाटप करताना,कराड नगरपालिकेचे(मुख्याधिकारी) यशवंत डांगे.
पंचगंगा कृष्णा व कोयना नद्यांना महापुर आल्याने,कोल्हापूर सांगली,कराड भागातील लाखो नागरिक,मुलं सध्या बेघरं झाली आहेत.तर,हजारो भुकेने व्याकूळ झाले आहेत. लहान मुलांची भुक भागविण्यासाठी श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने २० हजारांची बिस्किटे पाठविली आहेत. ही बिस्किटे कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तशेच,आज शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सांगलीत जिल्हा परिषदेचे (मुख्य उप कार्यकारी अधिकारी) घुले यांचे हस्ते लहान मुलांना बिस्किटे वाटप करण्यात येणार आहेत. कराड (नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन) पथकातील अधिकारी सुंदर गोसावी,सुनील कराळे,एम.एन.नदाफ,सचीन केकणे,अभिषेक पाटील,कृष्णा काटरे यांनी बिस्किटे वाटप करण्यासाठी सहकार्य केले.
अग्नीपंख फौंडेशनने पुरगस्त भागातील भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांसाठी बिस्कीटे वाटप करण्याचे ठरविताच,अनेक दात्यांनी निस्वार्थ भावनेने मदतीचा हात पुढे केला.त्यामुळे,पुरगस्तांना मदत करणे शक्य झाले आहे.
चांगला उपक्रम:
सांगली,कराड,कोल्हापूर पुरगस्त भागातील लहान मुलांना बिस्किटे वाटप करण्याचा चांगला उपक्रम राबविला.यामध्ये अनेकांनी योगदान दिले.अशा कामात सर्वांनी आपला सहभाग देण्याची गरज आहे.
ललीता संदीप भोसले(बाबर),(आंतरराष्ट्रीय धावपटू)
भुक भागली:
अग्नीपंख फौंडेशनच्या माध्यमातून,कराड शहरातील पुरगस्त भागातील मुलांना बिस्किटे वाटप करण्यात आली.यामध्ये भुकेल्या लहान मित्रांना दिलासा मिळाला आहे.
यशवंत डांगे,(मुख्याधिकारी,कराड न.पा.)
संभाजी ब्रिगेडची टिम सरसावली –
पुरगस्त भागातील आपत्ती ग्रस्तांना मदत करण्यासाठी, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी (जिल्हाध्यक्ष) टिळक भोस यांच्या मार्गदर्शनाखाली,श्रीगोंदा शहरात फिरुन धान्य,बिस्किटे,फरसाण,मिठाई जमा केले. ही मदतीची शिदोरी घेऊन,संभाजी ब्रिगेडची टिम आज दिनांक १० ऑगस्ट,शनिवारी पुरगस्त भागात जाणार आहे.अशी माहिती गोरख उंडे यांनी माध्यमांना दिली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading