श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनचा कोल्हापूर,सांगलीतील पिडीत पूरग्रस्तांना मदतीचा हात…

दिनांक १९ ऑगस्ट,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर,सांगली भागातील पिडीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी येथील वैदकीय क्षेत्रातील सदस्यांनी निधी जमा केला.यावेळी,बऱ्यापैकी वस्तुरुपात मदत जमा झाली. डॉ.विकास थिटे (BDS) यांनी २०० साड्या पूरग्रस्त महिलांना दिल्या .त्याचबरोबर मेजर नलगे यांनी २५०० रुपये रोख देणगी दिली.१५०० रुपये अन्य देणगीदरांकडून मिळाले तर,घारगाव येथील संपत शेठ संचेती यांनी २००० रुपयांचा खाद्य पदार्थ पूरग्रस्तांसाठी दिले. १०० ब्लँकेट, १०० सतरंजी, १०० टॉवेल, ई.साहित्य व डॉ.यशवंत चव्हाण यांनी बहुतांश मेडीसिन सोबत घेतले. मेडिकल असोसिएशन तर्फे मेडिसिनस खरेदी करण्यात आल्या. यावेळी,माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शुभेच्छा देत,परिक्रमा शिक्षण संकुलाची बस डिझेल टाकून विनामूल्य दिली.
रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता बारामती येथील सामजिक कार्यकर्ते व बारामती(मार्केट कमिटीचे अध्यक्ष) चिउशेठ जंजीरे यांनी या उपक्रमासाठी चहा,नाष्टा व फळे देऊ केली. श्रीगोंदा येथील वायंगडे सर व कन्या डॉ. प्रियंका यांनी खऱ्या अर्थाने मदत न मिळालेल्या दुर्लक्षित भागात,मेडिकल कँप लावण्यासाठी नियोजन करून दिले. पुढे सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील पूरग्रस्त गाव अमनापुर या ठिकाणी दत्तमंदिरात मेडिकल कँप लावण्यात आला.पूरग्रस्त लोकांची १२.३० ते २.३० या वेळेत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सेवा करण्यात आली. तेथील दुर्लक्षित व पिडीत पूरग्रस्त लोकांची सर्व डॉ. सदस्यांनी यावेळी,सेवा केली. पुढे हळगाव, धानगाव, भिलवडी, चोपडेवाडी या पूरग्रस्त भागात जाऊन श्रीगोंदा असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय सेवा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लोकांच्या व्यथा, समस्या, ऐकुन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करीत मानसिक आधार देण्यात आला.या भागातील लोकांच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतल्या असल्याचे डॉ.नवीन यादव यांनी मध्यामांना सांगितले आहे.
शिवाय राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे व भारतीय सेनेचे मदत कार्य उल्लेखनीय असल्याचे डॉक्टरांनी विशेष नमूद केले आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमणात जीवित हानी झाली आहे.माणसांसह मुकी जनावारे या अपत्तीचा शिकार झाली आहेत.सध्या प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून,आणखी काही दिवसांत साथींचे आजार पसरण्याची भीती येथे निर्माण होणार असल्याची शक्यता असल्याने,यापुढील वेळेत वैद्यकीयदृष्ट्या सजग राहण्याची गरज असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी डॉ.नवीन यादव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केली आहे.
श्रीगोंदा मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर कळमकर ,सचिव डॉ . संजय टकले , निमा चे माजी अध्यक्ष डॉ.अनिल क्षीरसागर ,खजिनदार डॉ.राजेश पाखरे, डॉ.दिलीप लगड, डॉ.शेलार, डॉ.यशवंत चव्हाण, डॉ.विक्रम भोसले, डॉ.कपिल, डॉ.गांगर्डे, डॉ.कुताळ, डॉ.देवकाते , डॉ.संतोष जगताप, डॉ.किशोर माचले, डॉ, बाळासाहेब पवार, डॉ.नवीन यादव, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडिया अध्यक्ष संकेत जंजीरे , विठ्ठल सोनवणे, सूरज गायकवाड, प्रा.रमेश शिंदे सर, बाळासाहेब बारगुजे, यांच्या सह श्रीगोंदा मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्थरांतून आभार मानण्यात येत आहेत.



